Sunday, April 28, 2024
घरमानिनीHealthआहारात काळ्या मिरीचा वापर ठरेल आरोग्यकारी

आहारात काळ्या मिरीचा वापर ठरेल आरोग्यकारी

Subscribe

स्वयंपाक घरातील मसाल्याचे पदार्थ हे जेवणाची चव वाढवण्यासाठीच मर्यादीत नसून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. काळी मिरी देखील त्यातीलच एक औषधी मसाला आहे.

असा करा काळ्या मिरीचा वापर

Black Pepper cultivation In Kerala | PepperHub

- Advertisement -
  • जुलाब आणि अपचनाचा त्रास झाल्यास काळ्या मिरीचे सेवन करावे. यामुळे पोट फुगणे, बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर काळ्यामिरीचे सेवन केल्याने पचनशक्ती देखील सुधारते.
  • काळ्या मिरीमध्ये वातहर गुण असल्यामुळे काण्यामिरीचे सेवन केल्यास पोटातील वायू साठून राहत नाही. त्यामुळे पोटात गॅस झाल्यानंतर काळी मिरी खाल्यास त्वरित आराम मिळतो.

Organic Black Pepper Powder* – GreenDNA® India

  • वजन कमी करायचे असल्यास काळ्यामिरीचे सेवन करावे. काळ्यामिरीमध्ये फायटोन्यूट्रियंटस्मुळे अतिरीक्त चरबी घटण्यास मदत होते. काळ्यामिरीचे सेवन केल्याने शरीराला अधिक घाम आणि लघवीला होते. यातून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
  • सर्दी, खोकला आणि कफ झाला असल्यास काळी मिरी खाल्याने सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो. तसेच गरम दूधासोबत काळ्यामिरीचे सेवन करावे. अधिक प्रमाणात सर्दी झाली असल्यास काळी मिरी आणि लसूण याचे सेवन करावे.
  • भूक लागत नसल्याची तक्रार असल्यास त्या व्यक्तीने काळी मिरीचे सेवन करावे. यामुळे भूक लागण्यास मदत होते.

 


हेही वाचा : मोदक खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे

- Advertisment -

Manini