हृदयविकारापासून वाचण्यासाठी करा ‘या’ खाद्यतेलांचा वापर

हृदयविकारापासून वाचण्यासाठी करा ‘या’ खाद्यतेलांचा वापर

अनेक घरांमध्ये जेवण बनवताना तेलाचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. परंतु डॉक्टर अनेक वेळा तेलाचा वापर कमी करण्याचा सल्ला देतात. आहारात तेलाचा अतिवापर करणं आपल्या शरीरासाठी हानिकारक मानलं जातं. तेलाच्या अतिवापराने हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. अशावेळी तेल योग्य प्रमाणात वापरावे तसेच तेल नियमित बदलत राहावे, जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या तेलांचे पोषकतत्त्व प्राप्त होतील.


सूर्यफुलाच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन-ईचे प्रमाण आढळते. या तेलाच्या वापराने फॅट बर्न होते. हृदयासाठी हे तेल उत्तम आहे. या तेलामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच हे तेल जेवणाची चव वाढवते.


शेंगदाणे खाणं आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. शेंगदाण्याच्या तेलात भरपूर व्हिटॅमीन आणि खनिजतत्त्वे आढळतात. शेंगदाण्याचे तेल हृदय, त्वचा आणि कर्करोगासारख्या आजारांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

या मोहरीच्या तेलामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे आपल्या शरीरातील जखम लवकर भरून येते. मोहरी तेलामुळे आपल्याला होणार्‍या इन्फेक्शनपासून आपण वाचू शकतो. तसेच ज्या लोकांना भूक कमी लागते त्यांनी मोहरीच्या तेलाचा वापर करावा. मोहरीचे तेल त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर असते.

सोयाबीन तेल आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. सोयाबीन तेलाच्या वापराने डोळे, दात, पचनक्रिया उत्तम राहते. तसेच हे कर्करोगासारख्या आजारांसाठी अतिशय उपयुक्त आहे.


राईस ब्रॅन ऑइल भाताच्या कोंढ्यापासून काढले जाते. यामध्ये व्हिटॅमीन-ई मुबलक प्रमाणात आढळते. या तेलाच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसेच हे हृदयविकार यांसारख्या आजारांसाठी देखील उत्तम आहे.


हेही वाचा :  कांद्याच्या पातीचे आहेत अनेक फायदे

First Published on: December 6, 2023 3:30 PM
Exit mobile version