हिवाळ्यात वापरा ‘हे’ फॅन्सी जॅकेट

हिवाळ्यात वापरा ‘हे’ फॅन्सी जॅकेट

आता लवकरच हिवाळा सुरु होईल. अशावेळी थंडी पासून बचाव करणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वेटर. मात्र, आता स्वेटर प्रमाणेच जॅकेटचा ट्रेंड आला आहे. थंडीच्या दिवसात जॅकेट हा सगळ्यांचा आवडता ट्रेंड आहे. अशा थंड वातावरणात तुमच्या त्वचेची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाला साजेल असे आणि थंडीपासून बचाव करेल असे जॅकेट निवडणं गरजेचं आहे.

हिवाळ्यात वापरा हे फॅन्सी जॅकेट

 

जिथे जास्त थंडी नसेल त्याठिकाणी तुम्ही इकत आणि बाटिक सारख्या कापडातील आधुनिक भारतीय फॅशनची जॅकेट वापरू शकता. या प्रकारचे जॅकेट तुम्हाला फॅशनेबल लूक देतात. ही जॅकेट सुती असली तरी यामधून छान ऊब मिळते. पेन्सिल स्कर्ट, डार्क डेनिसोबत किंवा कामावर जाताना ही जॅकेट तुम्ही घालू शकता.

 

हिवाळी वॉर्डरॉबमध्ये चौकटीची जॅकेट अनेकांकडे हमखास दिसतात.  जर तुम्हाला ही चौकटी पुरुषी वाटतं असेल तर फुलाफुलांचं किंवा नाजूक ब्लाऊजवर छोट्याश्या कानातल्यासोबत घाला. हे जॅकेट क्लासी दिसण्यासाठी टर्टल नेकसोबत घाला.

 

जेव्हा ट्रेंडबद्दल विचार केला जातो तेव्हा बेल्टेड कोट लक्षात येतोच. हे जॅकेट घट्ट जीन्स किंवा चांगल्या पँटसोबत खूप छान दिसते. तसंच या जॅकेटमध्ये जाड दिसत नाही.

 

हे जॅकेट थंडीच्या दिवसात खूप ट्रेंडिंग असते. आरामदायक आणि उबदार अशाप्रकारचे हे जॅकेट असते. पूर्वी हे जॅकेट स्कीइंगसाठी वापरले जात होते. जिथे खूप कडाक्याची थंडी असते अशा ठिकाणी अत्यंत उपयुक्त हे जॅकेट ठरते.

 

अलीकडे फ्लीस जॅकेट सगळीकडेच दिसतील विशेषतः प्रिंटेड फ्लीस किंवा कलाकुसर केलेल्या फ्लीसचे चलन आहे. लोकर किंवा शर्लिंगच्या विपरीत फ्लीस हे पूर्णपणे कृत्रिम जॅकेट असते. त्यामुळे ते ऊब धरून ठेवते.


हेही वाचा :

गाऊनमध्ये दिसा बोल्ड ब्युटीफूल, वापरा ‘या’ टीप्स

First Published on: October 29, 2023 6:45 PM
Exit mobile version