Tuesday, April 30, 2024
घरमानिनीFashionगाऊनमध्ये दिसा बोल्ड ब्युटीफूल, वापरा 'या' टीप्स

गाऊनमध्ये दिसा बोल्ड ब्युटीफूल, वापरा ‘या’ टीप्स

Subscribe

गाऊन घालणे प्रत्येक महिलेला आवडते. खासकरून कोणत्याही स्पेशल कार्यक्रमावेळी महिला गाउन घालणे पसंद करतात. परंतु गाउन घालताना महिला काही चुका करतात. त्यामुळे गाउनमधील लूक बिघडला जातो. अशातच गाउन कॅरी करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

महिलांसाठी खरंतर गाउन घालणे अत्यंत सोप्पे असते. कारण महिला गाऊनमध्ये कंम्फर्टेबल असतात. परंतु पार्टीवेळी गाऊन घालायचा असेल आणि तो कॅरी कसा करायचा असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. त्यामुळे गाऊन कॅरी करताना पुढील काही फॅशन टिप्स जरुर फॉलो करा. जेणेकरुन तुम्ही गाउनमध्ये सुंदर दिसाल आणि तुमचा लूक परफेक्ट होईल.

- Advertisement -

-गाउन आणि लहंगामधील फरक समजून घ्या
काही महिला गाउनची तुलना लहंगासोबत करतात. मात्र दोन्ही ड्रेसचे प्रकार हे वेगवेगळे आहेत. गाउन आणि लहंगा कॅरी करणे ते ज्वेलरी, मेकअप यामध्ये सुद्धा फार अंतर आहे. अशातच गाऊनमध्ये लहंग्यावरील लूक चुकूनही करू नका. अन्यथा पार्टीत तुमचा लूक बिघडला जाईल.

-अधिक ज्वेलरी घालणे टाळा
गाऊनसोबत कधीच भारगच्च दागिने घालणे टाळले पाहिजे. जर तुमचा गाऊन सिंपल असेल आणि लांबून तो पाहिल्यास गाऊन हैवी दिसतो. अशातच भरगच्च ज्वेलरी घातल्यास तुमचा लूक बिघडला जाऊ शकतो. यामुळे गाऊन हलका असो किंवा भारगच्च. त्यावर नेहमीच लाइट आणि कमीत कमी ज्वेलरी घालावी.

- Advertisement -

-विचारपूर्वक हिल्सची निवड करा
गाऊनसोबत हाय हिल्स सुंदर दिसतात. मात्र तुम्हाला हाय हिल्स घालण्याची सवय नसेल तर ती घालण्याची चुक करू नका. जड गाऊनसोबत हाय हिल्स घालून तुम्ही त्यावेळी अनकंम्फर्टेबल होऊ शकता. त्यामुळे तुमचा कॉन्फिडेंसही कमी होतो.

-हेअर स्टाइलकडे द्या
बेस्ट हेअर स्टाइलसह तुमचा लूक अधिक खुलून दिसू शकतो. गाउनचे डिझाइन पाहून तुम्ही हेअर स्टाइल करू शकता. यामुळे केस गाऊनमध्ये अडकणार नाहीत. शॉर्ट हेअर असतील तर तुम्ही ते मोकळे सोडू शकता.

-हलका मेकअप करा
गाऊनमध्ये सुंदर दिसण्यासाठी महिला अधिक मेकअप करतात. परंतु गाउनवर हैवी मेकअप कधीच सूट होत नाही. अशातच बेस्ट मेकअप लूकसाठी तुम्ही गाउनसह लाइट किंवा न्युट्रल टोन मेकअप कॅरी करू शकता. यामुळे तुमचा लूक अधिक सुंदर आणि परफेक्ट दिसेल.


हेही वाचा- वेलवेटच्या कपड्यांची अशाप्रकारे घ्या काळजी

 

- Advertisment -

Manini