Friday, December 8, 2023
घरमानिनीFashionकूल कूल थंडीसाठी वूलन शॉल

कूल कूल थंडीसाठी वूलन शॉल

Subscribe

पूर्वी शॉल ही फक्त हिवाळ्यात घेतली जायची. पण आता जर का आपण फॅशनच्या स्टाईलने पाहिले तर उबदार शॉल आता प्रत्येकजण विकत घेताना आपल्याला पाहायला मिळतो. तसेच आपण आता बघतो की फक्त थंडीसाठी नाही तर एक फॅशन क्रेझ म्हणून आजकाल शॉलचा वापर केला जातो. इस्लामिक संस्कृती आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये शॉल अधिक प्रसिद्ध आहेत.

मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक शॉल सुद्धा उपलब्ध आहेत. हल्ली मुली आणि मुलं डिझायनर शॉल घेताना आपल्याला पाहायला मिळतात. तसेच शॉलचे फॅब्रिक त्याची डिझाईन हा नेहमी चर्चेचा विषय ठरतो. आजकाल शॉलची ट्रेंडी फॅशन आपण आपल्या आऊटफिट नुसार बदलू शकतो. जर का तुम्हाला हव्या त्या डिझाइन्समध्ये शॉल कशी घ्यायची हे कळत नसेल तर हल्ली शॉलच्या कोणत्या डिझाइन्स ट्रेंडिंगमध्ये आहेत हे आपण पाहणार आहोत. आयताकृती, त्रिकोणी चौरस अशा एक आणि अनेक प्रकारात आपण हव्या त्या पॅटर्नच्या शॉल मार्केटमध्ये पाहू शकतो.

- Advertisement -

Style Notes: 5 Must Have Shawl Brands You Need To Check Out This Winter! – Secret Closet

1. लोकर शॉल 

लोकरीची शॉल ही हिवाळ्यात अतिशय उबदार आणि अंगाला त्रास देणारी नसते. तसेच लोकरीच्या शॉलचे कापड देखील उत्तम आणि टिकाऊ असते.

- Advertisement -

2. पश्मिना शॉल 

पश्मीना शॉल ही बारीक कश्मीरी लोकरपासून बनविलेलली असते. तसेच पश्मिना या कापडापासून सर्वोच्च कोमलता आणि उबदारपणा शरीराला मिळतो. यासोबतच थंडीतल्या कोणत्याही कपड्यावर पश्मिना शॉल तुम्ही घेऊ शकता. यामुळे तुम्हाला एक वेगळा लूक मिळेल.

3. चंकी शॉल 

जाड धाग्यापासून बनवलेल्या चंकी शॉल्स हा एक ट्रेंडी आणि फॅशनेबल उबदार लुक देतो. ज्यामुळे तुम्ही ही शॉल अगदी सहजपणे कोणत्याही आऊटफिटवर स्टाईल करू शकता.

4. ब्लँकेट शॉल 

मोठ्या आकाराची ब्लॅंकेट शॉल तुम्ही ओढणी सारखी वापरू शकता. तसेच ही ब्लॅंकेट शॉल उत्तम उबदारपणा देते. तुम्ही या ब्लँकेट शॉलचा वापर सगळ्याच आऊटफिटवर करू शकता.

5. कश्मीरी शॉल 

काश्मीरची काश्मिरी शॉल खूप प्रसिद्ध आहे. ही शॉल खासकरून काश्मिरी प्रिंट मध्ये जास्त करून उपलब्ध असते. जर का तुम्ही व्हरायटी कुर्ती किंवा एम्ब्रॉयडरी प्रिंटचे आऊटफिट्स घालणार असाल तर त्यावर कश्मीरी शॉल तुम्ही नक्की घालू शकता.

________________________________________________________________________

हेही वाचा : फर असणारे विंटर जॅकेट घरच्या घरी असे धुवा

- Advertisment -

Manini