घरमहाराष्ट्र'जरांगे नावाचं बाटूक जास्त बोलू नका, आमच्या हातात कोयता आहे'; ओबीसी नेते...

‘जरांगे नावाचं बाटूक जास्त बोलू नका, आमच्या हातात कोयता आहे’; ओबीसी नेते आक्रमक

Subscribe

राज्यातील सर्व वंजारी समाज कोयता घेऊन, छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या मागे आहे. त्यामुळे, जरांगे जास्त बोलू नका. आमच्या हातात कोयता आहे. लक्षात ठेवा रात्र वैऱ्याची आहे. जरांगे नावच बाटूक आणि त्याच्या मागच्या लोकांना बघायचं आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या मागे ओबीसी समाज आहे.

अंबड: मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये, यासाठी ओबीसी आणि भटके विमुक्त आरक्षण एल्गार सभा घेण्यात आली आहे. जालनातील अंबड येथे ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला अनेक ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी ओबीसी नेते आक्रमक भूमिका घेताना दिसले. त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे. जरांगे हे नावच बाटूक आहे त्यामुळे त्यांनी जास्त बोलू नये. आमच्या हातात कोयता आहे, असं ओबीसी नेते म्हणाले.  (Manoj Jarange Patil name is batuk don t talk too much We have sickle in our hands OBC leaders aggressive)

प्राध्यापक टी.पी. मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली. सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, राज्यातील सर्व वंजारी समाज कोयता घेऊन, छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या मागे आहे. त्यामुळे, जरांगे जास्त बोलू नका. आमच्या हातात कोयता आहे. लक्षात ठेवा रात्र वैऱ्याची आहे. जरांगे नावच बाटूक आणि त्याच्या मागच्या लोकांना बघायचं आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या मागे ओबीसी समाज आहे.

- Advertisement -

ओबीसी नेते काय म्हणाले? 

गोपीचंद पडळकर:  17 नोव्हेंबर या दिवसाचीै महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल. गटात आणि पक्षापक्षात विभागलेले वाघाचे बछडे एकत्र आले आहेत. ओबीसींना सहज आरक्षण मिळाले नव्हते. मोठा संघर्ष उभा राहिला मग आरक्षण मिळाले. आरक्षणाची वाटमारी करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. ओबीसींना त्रास देण्याची भूमिका घेतली आहे. ओबीसी समाज आता पूर्णपणे जागा झाला आहे. ओबीसीचा ढाण्या वाघ म्हणजे छगन भुजबळ आहेत. वाघ वयस्कर झाला म्हणून डरकाळी फोडायचे राहत नसतो, सिंह म्हातारा झाला म्हणून तो गवत खात नाही मांसच खात असतो. त्यांनी ओबीसींमध्ये उर्जा निर्माण करण्याचे काम केले आहे, असे म्हणत पडळकरांनी त्यांचे कौतुक केले.

विजय वडेट्टीवार: जातीनिहाय जनगणना करण्याचे आवाहन पंतप्रधानांना करू, कारण, जातीनिहाय जनगणनेनंतरच स्पष्ट होईल की, कोण किती आहेत. तेव्हा जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे केला. ते म्हणाले आज या सभेला तुम्ही आलात तुमच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आले आहात. येथे पक्षाचा विचार नाही, जो ओबीसी के हित की बात करेगा वही अपने दिल मे रहेगा, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा ओबीसीच्या हिताचा मुद्दा येथे लावून धरला.

- Advertisement -

‘या’ नेत्यांची उपस्थिती 

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राजेश राठोड, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, ओबीसी नेते बबनराव तायवाडे, महादेव जानकर, आमदार देवयानी फरांदे हे उपस्थित आहेत.

(हेही वाचा: …म्हणून लाठीचार्ज झाला; भुजबळांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला, जरांगेंवर केले गंभीर आरोप )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -