हेल्दी राहण्यासाठी शरीरास आवश्यक आहे एवढे कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी

हेल्दी राहण्यासाठी शरीरास आवश्यक आहे एवढे कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन शरिराच्या पोषक तत्त्वांचा महत्त्वाचा हिस्सा आहे. मात्र बहुतांश जणांना माहिती नसते की, नक्की प्रमाणात आपण कॅल्शिअम आणि व्हिटॅमिनचे सेवन केले पाहिजे. अशातच शरिरात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिनची शरिरात पुर्तता करण्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे डाएट. डाएटच्या माध्यमातून तुम्हाला भरपुर प्रमाणात व्हिटॅमिन आणि कॅल्शिअम मिळू शकते. खरंतर कॅल्शिअममुळे शरिरातील हाडं, रक्तवाहिन्या,स्नायू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. (Health care tips)

तर व्हिटॅमिन डी ला सनशाइन व्हिटॅमिन असे सुद्धा बोलले जाते. कारण सुर्याच्या किरणांच्या माध्यमातून ते आपल्याला मिळते. याची कमतरता तेव्हा भासते जेव्हा तुम्ही पुरेशा प्रमाणात सुर्याच्या किरणांच्या माध्यमातून किंवा व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचे सेवन करत नाही. व्हिटॅमिन डी हे एक पोषक तत्व असण्यासह एक हार्मोन सुद्धा आहे. त्यामुळे शरिराची वाढ होते.

महिला आणि पुरुषांमध्ये किती असावे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअमचे प्रमाण?
खरंतर शरिरात किती प्रमाणात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम असावे म्हणून हे व्यक्तीचे वय आणि त्याच्या लिंगावर सुद्धा अवलंबून असते.

19 ते 50 वर्षादरम्यान महिला आणि पुरुषांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण 1000 मिलीग्रॅम असावे
51 ते 70 वर्षादरम्यानच्या पुरुषांमध्ये 1000 मिलीग्रॅम तर वयाच्या 51 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या महिलांमध्ये 1200 मिलीग्रॅम कॅल्शिअम असावे.

तसेच बहुतांश लोकांमध्ये व्हिटॅमिन डी चा 50 nmol/L(20 ng/mL) यापेक्षा अधिकचा स्तर सामान्य असतो. तर 30 nmol/L(12 ng/mL) पेक्षा कमी स्तर तुमची हाडं कमकुवत आणि आरोग्याला प्रभावित करु शकते. त्याचसोबत 125 nmol/L (50 ng/mL) किंवा त्यापेक्षा अधिक व्हिटॅमिन डी चा स्तर हा आरोग्यासंबंधित जोखिम वाढवू शकतो.

जर तुम्हाला पुरेश्या प्रमाणात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम मिळत नसेल तर तुम्हाला ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका असतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी चे सेवन करा.


हेही वाचा- Monsoon: पावसाळ्यात व्हिटॅमिन डी ची कमतरता अशी करा पूर्ण

First Published on: July 18, 2023 11:48 AM
Exit mobile version