पीरियड्स दरम्यान उत्तम झोपेसाठी करा ‘हे’ उपाय

पीरियड्स दरम्यान उत्तम झोपेसाठी करा ‘हे’ उपाय

पीरियड्स दरम्यान खुप पोटात दुखणे, क्रॅम्प्सच्या कारणास्तव झोप येत नाही. सतत बैचेन झाल्यासारके वाटत राहते. अशातच पीरियड्स दरम्यान उत्तम झोपेसाठी पुढील उपाय करु शकता. (well sleep during periods)

सैल कपडे घाला


पीरियड्समध्ये आरामदायी वाटावे म्हणून सैल कपडे घालावे. रात्री झोपताना सुद्धा असेच कपडे असावत. यामुळे तुम्हाला व्यवस्थितीत झोप लागू शकते.

बालासन करा


झोपण्यापूर्वी बालासन करा. यामुळे शरिराला आराम मिळेल आणि मन ही शांत राहिल. असे जेव्हा होईल तेव्हा उत्तम झोप येईल.

एका कुशीत झोपा


पीरियड्स दरम्यान ओटीपोटाच्या येथे खुप दुखते. यापासून दूर राहण्यासाठी रात्री एका कुशीत झोपा.

झोपण्याची वेळ ठरवा


आपल्या झोपेची वेळ ठरवा. यामुळे तुम्हाला पूर्ण झोप मिळेलच पण हेल्दी सुद्धा रहाल.

हॉट वॉटर बॅगचा वापर करा


पीरियड्स दरम्यान उत्तम झोपेसाठी हॉट वॉटर बॅगचा वापर करा. यामुळे क्रॅम्प्स पासून आराम मिळेल.

पीरियड्स लीकेज


पीरियड्स लीकेज पासून दूर राहण्यासाठी तुम्ही लॉन्ग पॅड, टेम्पॉन, मेंस्ट्रुअल कपचा वापर करा. यामुळे ब्लड लीक होणार नाही आणि उत्तम झोप लागेल.


हेही वाचा- पीरियड क्रॅम्प्स देतात ‘या’ आजाराचे संकेत

First Published on: November 15, 2023 4:05 PM
Exit mobile version