निरोगी आरोग्यासाठी कोणत्यावेळी कोणते पदार्थ खाणं योग्य?

निरोगी आरोग्यासाठी कोणत्यावेळी कोणते पदार्थ खाणं योग्य?

निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं असतं. परंतु त्याहून जास्त गरजेचं आहे तो आहार योग्य वेळेत घेणं. उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक आहारासोबतच ते खाण्याची वेळ देखील महत्वाची मानली जाते. नाहीतर आरोग्यावर हवा तसा परिणाम पाहायला मिळत नाही.

कोणत्या वेळी कोणते पदार्थ खावे?

बटाटा नाश्त्यामध्ये किंवा दुपारी खाऊ शकता. बटाट्यातील स्टार्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. पण रात्री बटाटा खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता असते.

नाश्त्याच्या वेळी सफरचंद खाल्ल्याने ब्लड शुगर व कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. यातील पेक्टीन शरीर संतुलित ठेवते. रात्री सफरचंद खाल्ल्यास पेक्टीनचे पचन होत नाही. त्यामुळे आम्ल तयार होऊन अ‍ॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.

दुपारी केळी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्वचा सुंदर बनते. मात्र, रात्री खाल्ल्यास अपचन होऊ शकते. त्यामुळे वेळेचे भान ठेऊनच खाल्लेले बरे.

 

दूध नेहमी दिवसा घ्यावे कारण दिवसभरच्या कामात ते सहज पचते. परंतु रात्री दूध पिऊ नये. कारण दूध प्यायल्यानंतर आपण लगेच झोपतो. त्यामुळे ते दूध पचायला जड जाते.

सकाळी ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने ब्लडप्रेशरचा धोका कमी होतो. मात्र, रात्री ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.

नाश्त्यात टोमॅटो खाल्ल्यास पचनसंस्थेत सुधार होतो. पण जर का टोमॅटो रात्री खाल्ले तर पोटात सूज येऊ शकते.

दुपारी खाल्लेला भात तुमच्या पचनक्रियेला वाढवतो. यातील कार्बोहायड्रेट्स दुपारी शरीरात सहज शोषले जातात. रात्री खाल्लेला भात मात्र वजन वाढवण्यास कारणीभूत ठरु शकतो.

 


हेही वाचा :

वजन कमी करण्यासाठी साखरेपेक्षा गूळाचा चहा पिणं आहे फायदेशीर

First Published on: January 11, 2024 1:08 PM
Exit mobile version