Monday, May 13, 2024
घरमानिनीHealthवजन कमी करण्यासाठी साखरेपेक्षा गूळाचा चहा पिणं आहे फायदेशीर

वजन कमी करण्यासाठी साखरेपेक्षा गूळाचा चहा पिणं आहे फायदेशीर

Subscribe

अलीकडे अनेक पदार्थांमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. हेल्द एक्सपर्ट्सच्या मते, गुळ हा साखरेपेक्षा अत्यंत पौष्टिक असून याच्या वापराने आपले आरोग्य सुधारते. अनेकजण दिवसातून अनेकवेळी चहा पिणं पसंत करतात. दिवस असो किंवा रात्र कोणत्याही वेळ हे लोक चहाला नाही म्हणत नाहीत. परंतु दिवसातून जास्त चहा पिणं शरीरासाठी खूप घातक आहे. पण जर तुम्ही चहा पिणं थांबवू शकत नसला तर तुम्ही साखरेऐवजी गूळाचा चहा अवश्य प्या. यामुळे तुमच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.

गूळाचा चहा पिण्याचे फायदे

The Sweet Benefits of Jaggery Tea, Ingredients and Receipe – Doko

- Advertisement -

फिटनेसची काळजी घेणारे लोक साखरेपेक्षा गुळाला अधिक प्राधान्य देतात. गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज खनिजे तसेच कॅल्शियम, फॉस्फोरस आणि लोह हे घटक मुबलक प्रमाणात असतात.

  • वजन कमी करण्यास मदत

साखरेऐवजी गुळाचा चहा प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते. साखरेच्या चहाने वजन वाढते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांच्यासाठी गूळाचा चहा फायदेशीर आहे. गुळाच्या चहाचे सेवन केल्याने पोट भरलेले राहते आणि भूक कमी होते, ज्यामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी होते. हे पचनसंस्था देखील निरोगी ठेवते जे वजन नियंत्रणासाठी खूप महत्वाचे आहे.

- Advertisement -
  • मासिक पाळीत फायदेशीर

महिलांच्या मासिक पाळीच्या काळातही गूळाचा चहा घेणं फायदेशीर ठरतं. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या पोटाच्या असहाय्य वेदना गूळ त्वरित दूर करतो. त्याकाळात गूळ खाल्ल्यास पोटदुखी लगेच थांबते.

Jaggery Tea Benefits: ತೂಕ ಇಳಿಕೆ, ಮುಟ್ಟಿನ ನೋವು ನಿವಾರಣೆಗೆ ಪ್ರಯೋಜನ ಈ ಬೆಲ್ಲದ ಚಹಾ... | Jaggery Tea Health Benefits: For Weight Loss, Pregnancy, Advantages and Disadvantages in Kannada - Kannada Oneindia

  • पचनाचे विकार करतो दूर

गुळाच्या चहाचे नियमीत सेवन केल्यामुळे पोटाचे आणि पचनाचे विकार दूर होतात. तुम्हाला गॅस किंवा अॅसिडीटीचा त्रास होत असल्यास दररोज गुळाचा चहा प्या. यामुळे पोटामध्ये गॅस तयार होत नाहीत आणि तुमची पचनक्रियाही सुधारते.

  • शरीरातील रक्ताचे होते

गूळ आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम करतो. शिवाय गूळामुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते. त्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती आणि ताकदही वाढते.

  • शरीर डिटॉक्स करते

गूळामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. गूळाच्या चहा नियमित प्यायल्याने फुफ्लु, आतडी आणि पोट स्वच्छ होते. बद्धकोष्ठतेमध्ये देखील हा चहा फायदेशीर आहे.

 


हेही वाचा :

पनीरचे अतिसेवन ठरू शकते हानिकारक

- Advertisment -

Manini