घशात माश्याचा काटा अडकल्यास करा ‘हे’ उपाय

घशात माश्याचा काटा अडकल्यास करा ‘हे’ उपाय

मांसाहारी खवय्यांसाठी मासे हे अगदी प्रिय असतात. त्यांना चिकन, मटण सोबतच माशांचा आस्वाद घेणं देखील तितकेच आवडते. पण, मासे हे केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी नव्हे तर आरोग्यदायी फायद्यांसाठीही उपयुक्त ठरतात. म्हणूनच तुम्ही पहिल्यांदा मासे खाणार असाल तर थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. कारण करली सारखा काटेरी मासा खाताना तो काळजीपूर्वक खाणे फार गरजेचे असते. कारण माशाचा काटा घशाला लागण्याची भिती असते. पण, जर एखाद्यावेळेस घशाला माशाचा काटा लागल्यास काय करावे, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण, काळजी करु ना आज आम्ही तुम्हाला घशाला काटा लागल्यास काय करावे हे सांगणार आहोत.

भाताचा गोळा

अनेकदा मच्छिचे सेवन करताना छोटासा काटा घशाला लागतो. त्यावेळी काळजी न करता कोरडा भात घेऊन त्याचा गोळा करुन त्याचे सेवन करावे. यामुळे काटा सहज निघून जातो.

केळी

घशात काटा अडकल्यास केळ्याचे सेवन करावे. यामुळे घशात अडकलेला काटा सहज निघून जातो. जर एका केळ्यात तुम्हाला काटा निघून गेला, असे वाटत नसेल तर तुम्ही दोन ते तीन केळ्याचे सेवन करावे.

जोरात खोकावे

घशात काटा अडकल्यास जोरदात खोकावे. खोकल्यामुळे माशांच्या काट्यांना गळ्या खाली जाण्यापासून रोखू शकता. तसेच जोरात खोकल्यामुळे काटा सहज बाहेर येऊ शकतो.

First Published on: December 4, 2020 6:35 AM
Exit mobile version