Winter Health Tips: तुम्हालाही थंडी वाजतेय? मग खा ‘हे’ पदार्थ

Winter Health Tips: तुम्हालाही थंडी वाजतेय? मग खा ‘हे’ पदार्थ

Winter Diet tips: तुम्हालाही थंडी वाजतेय? मग खा 'हे' पदार्थ

हिवाळा सुरू झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी हिवाळ्यात पावसाने देखील हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. अशा वेळी स्वत:ची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हिवाळ्यातील झोंबणारी थंडी अनेकांना सहन होत नाही. स्वेटर,जॅकेट घालूनही त्यांची थंडी जात नाही. थंडी सुरू झाली की आपलं शरिर सतत उष्ण ठेवणं महत्त्वाचं आहे. अशा वेळी थंडी घालवण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये काही महत्त्वाचे बदल करणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला देखील थंडी वाजत असेल तुमच्या डाएटमध्ये हे पदार्थ नक्की खा.

हिरवी मिर्ची

हिरवी मिरची चवीला तिखट असली तरी त्यात अनेक गुण आहेत. हिरव्या मिरचीत व्हिटामिन सी,ई आणि फायबर असतात. त्याचप्रमाणे एंटीऑक्सिडेंट घटक देखील असतात त्यामुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

हळद

आयुर्वेदात हळदचे अनेक गुणकारी उपयोग सांगण्यात आले आहेत. हळद हा उष्णता निर्माण करणारा पदार्थ आहे. थंडीपासून आपले संरक्षण करायचे असेल तर हळदीचे सेवन नक्की करा. एक ग्लास गरम दुधात हळद टाकून तुम्ही पिऊ शकता. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणखी मजबूत होते.

कांदा


कांद्यात अनेक पोषक तत्त असतात. कांदा खाल्याने थंडी कमी होते. त्याचप्रमाणे डोळ्यांसदर्भात कोणते आजार असल्यास त्यावर कांदा खाणे उत्तम मानले जाते. तसेच कांदा खाल्ल्याने जखमा देखील लवकर भरल्या जातात.

 

आलं

आल्यात शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत. आलं घातलेला गरमा गरम चहा प्यायल्यास थंडी पळून जाईल आणि तुम्हाला जातेतवाणे वाटेल. त्याचप्रमाणे जेवणातही आल्याचा समावेश करायला काहीच हरकत नाही. भाज्यांमध्ये तुम्ही आलं किसून घालू शकता.

 

शेंगदाणे

 

हिवाळ्यात शेंगदाणे खाणे कधीही उत्तम मानले जाते. शेंगदाणे हा उष्ण पदार्थ आहे. त्याचप्रमाणे शेंगदाण्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात त्यामुळे शरिरातील प्रोटीन्सची कमतरता शेंगदाणे दूर करते. शेंगदाणे खाल्ल्याने शरिरातील उष्णता वाढते. स्नॅक्स म्हणून किंवा कोणत्याही भाजीत तुम्ही शेंगदाणे घालू शकता.


हेही वाचा – Jaggery Benefits- हिवाळ्यात गूळाबरोबर ‘हे’ पदार्थ खा, आजारांना दूर ठेवा

 

First Published on: December 2, 2021 11:09 AM
Exit mobile version