घरलाईफस्टाईलJaggery Benefits- हिवाळ्यात गूळाबरोबर 'हे' पदार्थ खा, आजारांना दूर ठेवा

Jaggery Benefits- हिवाळ्यात गूळाबरोबर ‘हे’ पदार्थ खा, आजारांना दूर ठेवा

Subscribe

हिवाळा म्हटलं की सर्दी, खोकला, ताप, घसादुखी, सांधेदुखी हे आजार आलेच. कारण बदलत्या हवामानाचा वातावरणावर परिणाम होतो आणि वातावरणाचा शरीरावर. यामुळे या दिवसात वरील आजारही ओघाने येतात. पण किचनमधील काही वस्तू वापरून या आजारांना रोखता येतं. त्यात हिवाळ्यात गूळाचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. हाडेतर मजबूत होतातच त्याशिवाय अन्नपचन, रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत होते. गूळात व्हिटामीन बीसह कॅल्शियम,झिंक, कॉपर,आणि फॉस्फरससारखे विविध घटक आढळतात. यामुळे गूळ शरीरासाठी आवश्यक तर आहेच पण त्याचबरोबर असेही काही पदार्थ आपण गूळासोबत खाऊ शकतो ज्याचे दुहेरी फायदे आहेत.

गूळ-तूप- शु्द्ध तूपाबरोबर गूळ खाल्ल्याने बद्धकोष्ठाची समस्या दूर होते. जेवणानंतर एक चमचा गूळ आणि तूपाचे सेवन केल्यास अन्नपचन प्रक्रीया सुलभ होते. शौचास साफ होते.

- Advertisement -

गूळ-धने-तज्त्रांच्या मते महिलांनी परियडसचा त्रास होत असल्यास धने आणि गूळ एकत्र खावा. त्यामुळे ब्लीडींग कमी होऊन पोटदुखीही थांबते. तसेच ज्या महिलांना PCODचा त्रास होतो. ज्यांचे परियडस अनियमित आहेत त्या महिलांनी गूळाबरोबर धने खाल्ल्यास पाळी नियमित होऊ शकते.

गूळ-बडीशोप-ज्यांच्या तोंडाला दुर्गंधी येते त्यांनी गूळ आणि बडीशोप एकत्र करुन खावी. तोंडातील आजारांसाठी गूळ बडीशोप उत्तम औषध आहे.

- Advertisement -

गूळ-मेथी-गूळाबरोबर मेथी खाणे केसांसाठी फायदेशीर आहे. यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतील. तसेच अकाली केस पांढरे होणेही थांबते.

गूळ डिंक- स्तनदा मातांसाठी गूळ डिंगाचे सेवन फायदेशीर आहे. तसेच गूळ डिंगामुळे हाडे मजबूत होतात.

गूळ अळीव-गूळाबरोबर अळीव खाल्ल्याने शरीरात फॉलिक अॅसिड आणि आर्यनची कमतरता दूर होते. याच्या नियमित सेवनाने त्वचा तजेलदार होते. केसांची वाढही होते.

गूळ शेंगदाणे- गूळ शेंगदाणे फक्त खाण्यासाठी चविष्ट नाही तर शरीरात उर्जा निर्माण करतात. भूक भागवण्यासाठीही गूळ शेंगदाणे खाल्ले जातात.

गूळ तिळ-गूळ तीळ एकत्र खाल्ल्यास सर्दी, खोकला यासारखे आजार बरे होतात.

गूळ हळद- गूळाबरोबर हळदीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. हिवाळ्यातील आजारांवर गूळ हळद प्रभावी ठऱते.

गूळ सुंठ- जर ताप आला असेल तर गूळ आणि सुंठीच्या गोळ्या घ्यावात. लगेच आराम मिळेल.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -