चाळीशीनंतर प्रत्येक महिलेच्या शरीरात होतात हे बदल

चाळीशीनंतर प्रत्येक महिलेच्या शरीरात होतात हे बदल

Women Mental Health

एक महिला असणे हे सोप्प नव्हे. कारण तारुण्यानंतर जेव्हा ती वयात आल्यानंतर तिला घर-परिवारासह मुलांची देखभाल करावी लागते. तसेच वयाच्या चाळीशीनंतर काही आजारांचा सामना तिला करावा लागतो. महिला जेव्हा वयाच्या चाळीशीत पोहचतात तेव्हा त्यांच्या शरिरात काही बदल होण्यास सुरुवात होते. खरंतर या वयात बहुतांश महिलांना मेनोपॉजची समस्या सुरु होते.

ब्रेन फॉगिंह
वयाच्या चाळीशीनंतर महिलांमध्ये ब्रेन फॉगिंगची समस्या सुरु होते. या दरम्यान त्या लहान-लहान गोष्टी त्या विसरु लागतात. ऐवढेच नव्हे तर एखादी वस्तू ठेवली असेल तरीही त्या विसरतात.

वजन वाढणे
या वयात महिलांची फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी होते. यामुळे त्यांच्यामधील मेटाबॉलिज्म कमी होतो आणि वेगाने वजन वाढू लागते.

केस गळणे
हार्मोनल बदलावामुळे वयाच्या चाळीशीनंतर महिलांचे केस वेगाने गळू लागतात. ऐवढेच नव्हे तर वय वाढण्यासह त्यांची केस सफेद होऊ लागतात.

फेशियल हेअर वाढणे
वयाच्या चाळीनंतर महिलांच्या शरिरात एस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे चेहरा, ओठ आणि बोटांवर केस वाढू लागतात.

आर्थराइटिस
बहुतांश महिलांना वयाच्या चाळीशीनंतर आर्थराइटिसची समस्या निर्माण होते. या दरम्यान त्यांचे सांधे खुप दुखतात.

युरिन इन्फेक्शन
जसे जसे आपवे वय वाढते तेव्हा युरिन करण्यासाठी मदत करणाऱ्या नसा कमजोर होऊ लागतात. यादरम्यान मुत्राशयाचे स्नानू जाड होतात आणि याच कारणास्तव महिलांना युरिनवर कंट्रोल ठेवणे मुश्किल होते.

अनियमित पीरियड्स
चाळीशीनंतर महिलांना मासिक पाळी नियमित येणे बंद होते. या दरम्यान कधी कधी त्यांना काही महिन्यांनी मासिक पाळी येते. त्यावेळी त्यांचा ब्लड फ्लो हा अधिक हेवी असतो.


हेही वाचा- ब्रेस्ट सैल होण्याची ‘ही’ आहेत कारणे

First Published on: May 17, 2023 11:47 AM
Exit mobile version