World Heart Day 2020: कोरोना काळात असे ठेवा तुमचे हृदय सशक्त!

World Heart Day 2020: कोरोना काळात असे ठेवा तुमचे हृदय सशक्त!

जगभरात कोरोनाने थैमान घातले असून अशा महामारीच्या काळात सर्वांनीच आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आज, २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा होत असताना कोरोनाच्या संकटकाळात आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी याबाबत जाणून घेणार आहोत. २००२ पासून जागतिका हृदय दिन साजरा होण्यास सुरूवात झाली. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, हृदयासंबंधीत आजारामुळे दरवर्षी १८०० कोटी रुग्णांचा मृत्यू होतो. अशात आपले हृदय सशक्त ठेवणे आवश्यक आहे. शिवाय सध्या कोरोनाच्या संकटकाळात त्याची खास काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी जाणून घेऊया काही टीप्स…

भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत आणि बरेच लोक या आजाराला बळी पडले आहेत. कोरोना सारख्या आजाराच्या संक्रमण काळात वेळीच काळजी न घेतल्यास गंभीर श्वसन विकारांना आमंत्रण देते. जेव्हा हृदयाला रक्त पुरवठा होण्यात अडथळा निर्माण झाल्यास हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ शकतो. कोरोना व्हायरस सारख्या साथीच्या आजारात प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. तीव्र हार्ट अटॅकची लक्षाणांमध्ये छातीत दुखणे, मळमळ होणे, पचन, उलट्या होणे, थकवा जाणवणे आणि हलकीशी डोकेदुखी यांचा समावेश आहे. व्यक्तींनुसार ही लक्षणेही बदलू शकतात. चूकीची जीवनशैली, लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि कौटुंबिक इतिहास ही हार्ट अटॅकची कारणे असू शकतात.
– डॉ. रवी गुप्ता, हृदय रोग तज्ज्ञ, वोक्खार्ट हॉस्पिटल, दक्षिण मुंबई

हेही वाचा –

नवाज शरीफ भारताचे एजंट, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी होते गुप्तपणे चर्चा?

First Published on: September 29, 2020 10:43 AM
Exit mobile version