राहुल गांधी

राहुल गांधी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून राहुल गांधींकडे काँग्रेसमधील एक गट जसा भावी पंतप्रधान म्हणून पाहातोय, तसाच एक गट त्यांना अंतर्गत विरोध देखील करत आहेत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींना राहुल गांधी सक्षम पर्याय खरंच ठरतील का? असा प्रश्न मात्र कायम आहे.
A view of the sea
Pravin Wadnere

बीकेसीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर कडाडून टीका केली. मग ते राफेल करार असो, अंबानी-माल्ल्या-चोक्सींची माफ केलेली कर्ज असो किंवा नोटबंदीचा मुद्दा असो. विशेष म्हणजे यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्यासमोर बसून चर्चा करण्याचं आव्हान दिलं आहे. इतकंच नाही, तर मोदी जर माझ्यासमोर चर्चेला बसले, तर त्यांना देश सोडून पळ काढावा लागेल, असं देखील राहुल गांधी म्हणाले आहेत. दरम्यान, यावेळी सत्ता आली तर ‘प्रत्येक भारतीय गरीबाच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा करणार’, अशी मोठी घोषणा यावेळी राहुल गांधींनी केली. त्यामुळे या सभेपासून मुंबईतल्या प्रचाराचं रणशिंगच एका अर्थाने राहुल गांधींनी फुंकलं आहे. त्यामुळे आगामी काळात आता भाजप आणि काँग्रेसमध्ये उडणाऱ्या प्रचाराच्या रणधुमाळीची ही एक नांदी ठरावी.

तर मोदींना देश सोडून पळ काढावा लागेल – क्लिक करा लिंकवर आणि वाचा सविस्तर!

…तर मोदींना देश सोडून पळ काढावा लागेल – राहुल गांधी
First Published on: February 26, 2019 3:35 PM
Exit mobile version