घरमुंबई...तर मोदींना देश सोडून पळ काढावा लागेल - राहुल गांधी

…तर मोदींना देश सोडून पळ काढावा लागेल – राहुल गांधी

Subscribe

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी मुंबईच्या बीकेसीमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली.

बीकेसीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर कडाडून टीका केली. मग ते राफेल करार असो, अंबानी-माल्ल्या-चोक्सींची माफ केलेली कर्ज असो किंवा नोटबंदीचा मुद्दा असो. विशेष म्हणजे यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्यासमोर बसून चर्चा करण्याचं आव्हान दिलं आहे. इतकंच नाही, तर मोदी जर माझ्यासमोर चर्चेला बसले, तर त्यांना देश सोडून पळ काढावा लागेल, असं देखील राहुल गांधी म्हणाले आहेत. दरम्यान, यावेळी सत्ता आली तर ‘प्रत्येक भारतीय गरीबाच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा करणार’, अशी मोठी घोषणा यावेळी राहुल गांधींनी केली. त्यामुळे या सभेपासून मुंबईतल्या प्रचाराचं रणशिंगच एका अर्थाने राहुल गांधींनी फुंकलं आहे. त्यामुळे आगामी काळात आता भाजप आणि काँग्रेसमध्ये उडणाऱ्या प्रचाराच्या रणधुमाळीची ही एक नांदी ठरावी.

‘तर मोदींना देश सोडून पळावं लागेल’

यावेळी मोदी ४ वर्षांत एकदाही उत्तरं देण्यासाठी पत्रकारांसमोर किंवा विरोधी पक्षांसमोर आलेले नाहीत, अशी टीका राहुल गांधींनी केली. ‘मोदींनी १५ मिनिटं समोर बसावं. दूध का दूध पानी का पानी करून टाकेन. माझ्यासमोर २ मिनिटं बसून मोदींनी डिबेट करावं, देश सोडून पळून जावं लागेल हे सांगून ठेवतो मी’, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

- Advertisement -

‘प्रत्येक गरीबाच्या बँक खात्यात थेट पैसे टाकू’

‘मला मेड इन चायना किंवा मेड इन जपान नकोय, मला मेड इन धारावी, मेड इन मुंबई हवंय. काँग्रेस पक्षाचं सरकार जेव्हा २०१९मध्ये येईल, तेव्हा सरकार येताच भारतातल्या प्रत्येक गरीब व्यक्तीला किमान आर्थिक मदतीची खात्री असेल. म्हणजे प्रत्येक गरीबाच्या अकाउंटमध्ये थेट पैसे टाकले जातील’, अशी मोठी घोषणा यावेळी राहुल गांधींनी केली.

‘शेतकऱ्याला १७ रुपये दिले आणि यांचे खासदार टाळ्या वाजवतात’

प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये १५ लाख रुपये मिळणार होते. पण कुणाला मिळाले का? शेतकऱ्याला १७ रुपयांचं अनुदान दिलं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला साडेतीन रुपये. आणि संसदेत भाजपचे खासदार टाळ्या वाजवतात. कारण त्यांना भिती असते की जर टाळ्या नाही वाजवल्या तर मोदी मारतील. अंबानींना ३० हजार कोटी दिले, तेव्ह टाळ्या का वाजवल्या नाहीत? नीरव मोदीला ३५ हजार कोटी दिले, विजय माल्ल्याला १० हजार कोटी दिले तेव्हा टाळ्या का नाही वाजवल्या. पण शेतकऱ्याला दिवसाला साडेतीन रुपये दिले तर संसदेतले यांचे खासदार टाळ्या वाजवतात, टेबल वाजवतात.

- Advertisement -

वाचा शरद पवार काय म्हणतायत – मुख्यमंत्र्यांचे आश्वासन लबाडा घरचं आवताण!

‘मोदींना २ भारत बनवायचे आहेत’

यांना दोन भारत बनवायचे आहेत. एक श्रीमंतांचा, ज्यात २०-२५ लोकं आहेत. त्यात अनिल अंबानी, नीरव मोदी, मेहुल चोक्सी अशी लोकं आहेत, ज्यांचं कर्ज २ मिनिटांत माफ होईल, जमीन मिळेल, वीजबील माफ होईल. आणि दुसऱ्या भारतात शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागेल, लोकांना आपले पैसे अनिल अंबानीच्या कंपनीला द्यावे लागतील आणि जेव्हा भूकंप होईल तेव्हा तुम्ही उपाशी मरणार. आणि तेव्हा मोदी ८ वाजता टीव्हीवर येऊन म्हणतील ‘काले धन के खिलाफ लडाई लडनी है. आणि देशातल्या सर्व प्रामाणिक लोकांनी तयार होऊन तुमचे पैसे काढून बँकेत भरा. तुम्ही लाइनमध्ये उभे आहात, तुमचा वेळ महत्त्वाचा नाही. पण अनिल अंबानी, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, ललित मोदी लाइनमध्ये उभे होते का? तुम्ही लाइनमध्ये होते, तेव्हा ते प्रायव्हेट विमानात उडत होते. आणि बँकेत मागच्या दाराने त्यांचा काळा पैसा पांढरा होत होता. चौकीदाराने हे केलं. आणि जे पैसे तुम्ही भरले, त्यातून मोदींनी ५० ते ६० लोकांचं कर्ज माफ करून टाकलं.

HALचं कंत्राट काढून अंबानीला का दिलं?

मोदी एचएएलचा पैसा घेऊन अनिल अंबानींच्या खिशात टाकतात. चौकीदार चोर है. ते फक्त चोर नाही, घाबरट सुद्धा आहेत. संसदेत राफेलविषयी चर्चा सुरू असताना आम्ही विचारलं एचएएलचं कंत्राट अनिल अंबानीला का दिलं? आमच्या डोळ्यात डोळे घालून ते बोलू शकत नव्हते. ते जनतेच्या डोळ्यात डोळे घालू शकत नव्हते. कारण चौकीदार चोर आहे.

‘रात्री दीड वाजता CBIच्या संचालकांना का काढलं?’

मोदींना सीबीआयच्या संचालकांना रात्री दीड वाजता पदावरून हटवण्याची गरज का पडली? काही दिवसांनी सर्वोच्च न्यायालय म्हणतं की त्यांना पुन्हा पदावर नेमा. मोदींना त्यांना हटवायचंच होतं. प्लॅनिंग कमिशन देशाचं धोरण बनवायचं. पण त्याला बंद करून टाकलं. आरबीआय म्हणजे अर्थव्यवस्थेचा कणा. पण गव्हर्नर राजीनामा करण्याची पहिलीच घटना इतिहासात घडले. नोटबंदीतून लाखोंना बेरोजगार केलं. सर्वोच्च न्यायालयाचे ४ न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन सांगतात की आम्हाला काम करू दिलं जात नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -