लोकसभा निवडणुकीसाठी ४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी ४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

election

सात लोकसभा मतदार संघात काल पहिल्या टप्प्याची नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. तर आज दि. १९ रोजी १० लोकसभा मतदार संघातील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. आज दि. १९ ला ११- भंडारा- गोंदिया मतदार संघात सुहास अनिल फुंदे (अपक्ष) आणि भीमराव डी. बोरकर (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया(डी)) यांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली. १६- नांदेड लोकसभा मतदार संघात पठाण जाफर अली खान एम. खान (इंडियन डेमोक्रॅटिक मूव्हमेंट) यांनी आणि ४२- सोलापूर मतदार संघात वेंकटेश्वर एम. अलियास खटकधोंड (हिंदुस्थान जनता पार्टी) यांनी आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.

काल झालेले नामनिर्देशन

काल दि.१८ रोजी १०- नागपूर लोकसभा मतदार संघात अब्दुल करीन अब्दुल गफ्फार पटेल (अपक्ष) यांनी आणि १४- यवतमाळ मतदार संघात सुनील नटराजन नायर (अपक्ष) आणि रमेश जी. पवार (भारतीय बहुजन आघाडी जनता दल (एस)) यांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.


हेही वाचा- लोकसभा निवडणूक सात टप्प्यात

हेही वाचा- यावर्षी २,२९३ पक्ष लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात


 

First Published on: March 19, 2019 9:00 PM
Exit mobile version