नाशिक शहरात 108 नवे रुग्ण करोनाबाधित

नाशिक शहरात 108 नवे रुग्ण करोनाबाधित
नाशिक शहरात करोनाने धुमाकूळ घातला असून, रविवारी (दि.21) दिवसभरात 131 नवे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात नाशिक शहरात 108, नाशिक ग्रामीण 22 आणि जिल्ह्याबाहेरील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात दिवसभरात सात बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 766 करोनाबाधित रुग्ण असून एकट्या नाशिक शहरात 1 हजार 208 रुग्णांचा समावेश आहे.
    मालेगाव पाठोपाठ नाशिक शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नाशिक शहरात दररोज शंभराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. खबरदारी म्हणून आरोग्य विभागातर्फे रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातलग व नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. रविवारी दिवसभरात 189 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर दिवसभरात 371 संशयित रुग्ण विविध रुग्णालयात दाखल झाले आहेत. यात जिल्हा रुग्णालय 16, नाशिक महापालिका रुग्णालय 267, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 4, मालेगाव रुग्णालयात 23, नाशिक ग्रामीण रुग्णालयात 61 रुग्ण दाखल झाले आहेत.
  जिल्ह्यात 2 हजार 824 बाधित रुग्ण असले तरी 1 हजार 621 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 282, नाशिक शहर 504, मालेगाव 776, अन्य 58 रुग्णांचा समावेश आहे. सध्या 930 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनास अद्याप 455 संशयित रुग्णांचा अहवाल मिळालेले नाहीत. यात नाशिक ग्रामीण 58, नाशिक शहर 217, मालेगाव 180 रुग्णांचा समावेश आहे.
नाशिक करोना अहवाल
पॉझिटिव्ह रुग्ण-2766(मृत-165)
नाशिक शहर-1208 (मृत-62)
नाशिक ग्रामीण-544 (मृत-23)
मालेगाव-929 (मृत -70)
अन्य-84(मृत-10)
First Published on: June 21, 2020 9:03 PM
Exit mobile version