महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मरण पावलेले श्रीसदस्य कोण आहेत?

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मरण पावलेले श्रीसदस्य कोण आहेत?

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला असला तरी या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. या सोहळ्यात उपस्थित असलेल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांना उष्माघात झाला. या कार्यक्रमात उष्माघातामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत देणार असल्याचं सांगितलं.

कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उष्माघात झालेल्या काही जणांवर उपचार सुरू असून दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. खारघरमधील टाटा रुग्णालय, पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालय तसंच मेडी कव्हर रुग्णालयात काही जण ऍडमिट असल्याची माहिती आहे. या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी सकाळपासूनच राजकीय नेते रूग्णालयात दाखल होताना दिसत आहेत. नुकतंच राज ठाकरेंनी सुद्धा कामोठे इथल्या एमजीएम रूग्णालयात रूग्णांची भेट घेतलीय. दरम्यान, मृत्यू झालेल्या श्री सदस्यांची नाव पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत.

हे ही वाचा : भाजपमध्ये कुणाला यायचं असेल तर त्यांचं स्वागत – चंद्रकांत बावनकुळे

उष्माघातामुळे मृत पावलेल्या श्री सदस्यांमध्ये ८ महिला श्री सदस्या, ३ पुरुष श्री सदस्यांचा समावेश आहे. एकूण १२ मृतदेह पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय पनवेल नेण्यात आले होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

1) महेश नारायण गायकर (वय 42, गाव- वडाळा, मुंबई, मूळ गाव – म्हसळा मेहंदडी)
2) जयश्री जगन्नाथ पाटील (वय 54, गाव – म्हसळा, रायगड)
3) मंजुषा कृष्णा भोंबंडे (वय 51, गाव – गिरगाव मुंबई मुळगाव श्रीवर्धन)
4) स्वप्निल सदाशिव केणी (वय 30, गाव – शिरसाटबामन पाडा विरार)
5) तुळशीराम भाऊ वांगड (वय 58, गाव -जव्हार पालघर)
6) कलावती सिद्राम वायचळ (वय 45, गाव – तोडकर आळी सोलापूर)
7) भीमा कृष्णा साळवी (वय 5, गाव- कळवा ठाणे)
8) सविता संजय पवार (वय 42, गाव-मुंबई)
9) पुष्पा मदन गायकर (वय 64, गाव-कळवा ठाणे)
10) वंदना जगन्नाथ पाटील (वय 62, गाव- करंजाडे, पनवेल)
11) मिनाक्षी मिस्त्री (वय 58, गाव- वसई)
12) विनायक हळदणकर (वय 55, गाव- कल्याण)

हे ही वाचा: नाट्य परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर; प्रशांत दामले विजयी

एकूण १२ मृतदेह पैकी दहा मृतदेह वारसाच्या ताब्यात देण्यात आले असून बेवासर असलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटलेली आहे. मिनाक्षी मिस्त्री या रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यानं नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. मात्र मिनाक्षी मिस्त्री यांचा मृत्यू उष्माघाताने नव्हे तर चेंगराचेंगरीनं झाला, असा आरोप मिनाक्षी यांच्या भावाने केलाय.

First Published on: April 17, 2023 2:28 PM
Exit mobile version