औरंगाबादमधील एमआयडीसीत कोरोनाचा शिरकाव; ४० जण पॉझिटिव्ह

औरंगाबादमधील एमआयडीसीत कोरोनाचा शिरकाव; ४० जण पॉझिटिव्ह

कोरोना व्हायरस

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढताना दिसत असून दररोज १०० पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. ही चिंतेची बाब असतानाच आता कोरोनाने इंडस्ट्रीमध्ये देखील शिरकाव केला आहे. त्यामुळे औरंबादमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

औरंगाबाद वाळूज एमआयडीसीतील नामांकित बजाज कंपनीमध्ये गेल्या पाच-सहा दिवसात २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर याच भागातील स्टारवेज नावाच्या कंपनीत ही २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर वाळुज पंढरपुर भागात दीडशेपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. तर बजाज कंपनीने जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या आजूबाजूला काम करणाऱ्या १०० कर्मचाऱ्यांना होम क्वॉरंटाईन होण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

राज्यात १४२ कोरोना मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा वाढू लागला असून आज दिवसभरात तब्बल १४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात मृत्यू झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा आता ५ हजार ८९३ इतका झाला आहे. यासोबतच रुग्णांचा आकडा देखील वाढत असून आज दिवसभरात ३ हजार ८२७ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १ लाख २४ हजार ३३१ इतका झाला असून त्यापैकी ५५ हजार ६५१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर ६२ हजार ७७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज दिवसभरात १९३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


हेही वाचा – धक्कादायक! पालिकेचे १०८ अधिकारी-कर्मचारी बाधित


 

First Published on: June 20, 2020 3:26 PM
Exit mobile version