घरताज्या घडामोडीधक्कादायक! पालिकेचे १०८ अधिकारी-कर्मचारी बाधित

धक्कादायक! पालिकेचे १०८ अधिकारी-कर्मचारी बाधित

Subscribe

पालिकेचे तब्बल १०८ अधिकारी आणि कर्मचारी देखील बाधित आहेत. त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेची इमारत 'हॉटस्पॉट' ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग केवळ सामान्य नागरिकांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आता पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, पुणे पालिकेत नेहमीच वावर असलेल्या काही नगरसेवकांसह त्यांच्या जवळच्या नातलगांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यासोबतच पालिकेचे तब्बल १०८ अधिकारी आणि कर्मचारी देखील बाधित आहेत. त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेची इमारत ‘हॉटस्पॉट’ ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

१० कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

पुणे महापालिकेच्या १०८ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाचीबाधा झाली होती यातील १० कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनाबाधितांमध्ये ४४ सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर एकूण १०८ कर्मचाऱ्यांपैकी ५३ जणांना यशस्वी उपचानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर ४५ जणांवर अजूनही उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४ हजार १८१ पर्यंत पोहचली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत ५६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनाबाधित रुग्ण वाढल्यामुळे हवेली तालुक्यातील मायक्रो कंटेनमेंट झोनमध्ये देखील वाढ करण्यात आली असून वाघोली परिसरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या घटली आहे. परंतु, हवेली तालुक्यात ६ जून रोजी प्रतिबंधित क्षेत्राची संख्या ३१ होती, ती आता ४५ पर्यंत वाढली आहे.

१२ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर

पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ससून रुग्णालयाला चाचण्यांची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे १२ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः याबाबत माहिती दिली असून यावेळी अजित पवार यांनी अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचेही निर्देश प्रशासनाला दिले आहेत. यात कोरोना चाचणीसाठी आवश्यक साधनसामुग्रीसाठी ८ कोटी ९१ लाख रुपयांचा, तर यंत्रसामुग्रीसाठी ३ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय इतर आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी ७ कोटी १५ लाख ८१ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पुनम पाणीपुरवठा योजनेच्या कामाला एक वर्षाची मुदतवाढ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -