राज्यात ४,३०४ नवे रुग्ण, ९५ जणांचा मृत्यू

राज्यात ४,३०४ नवे रुग्ण, ९५ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात 1,134 कोरोनाबाधितांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

राज्यात ४,३०४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८,८०,८९३ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ६१,४५४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ९५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृत्यूंची संख्या ४८,४३४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ९५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १२, नाशिक ४, अहमदनगर ९, जळगाव ४, पुणे ५, सोलापूर ९, सातारा ४, औरंगाबाद १४, नागपूर १० यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ९५ मृत्यूंपैकी ५७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २१ मृत्यू नागपूर ५, औरंगाबाद ५, सोलापूर ३, अहमदनगर ३, जळगाव १, नाशिक १, परभणी १,रायगड १ आणि वर्धा १ असे आहेत.

आज ४,६७८ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १७,६९,८९७ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१ % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१८,७१,४४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,८०,८९३ (१५.८४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०९,४७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,९९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: December 16, 2020 8:59 PM
Exit mobile version