Maharashtra Corona Update: राज्यातील रुग्णसंख्येत वाढ! 24 तासांत 460 नव्या रुग्णांची वाढ, तर 5 जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: राज्यातील रुग्णसंख्येत वाढ! 24 तासांत 460 नव्या रुग्णांची वाढ, तर 5 जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: राज्यातील रुग्णसंख्येत वाढ! 24 तासांत 460 नव्या रुग्णांची वाढ, तर 5 जणांचा मृत्यू

राज्यात काल, सोमवारी 18 एप्रिल 2022 नंतर सर्वाधिक घट झालेल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येची नोंद झाली होती. काल राज्यात 225 नव्या कोरोनाबाधित आढळले होते आणि एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नव्हती. मात्र आज राज्यातील रुग्णसंख्येत काल आकडेवारीच्या तुलनेत वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 460 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून 5 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 78 लाख 69 हजार 498वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 1 लाख 43 हजार 745 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 3 हजार 209 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात आज 718 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण 77 लाख 18 हजार 541 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 83 लाख 67 हजार 636 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78 लाख 69 हजार 498 (10.04 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25 हजार 557 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 605 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

देशातील कोरोना परिस्थिती

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – 4 कोटी 29 लाख 71 हजार 308
देशातील एकूण मृत्यूची संख्या – 5 लाख 15 हजार 210
देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – 4 कोटी 24 लाख 06 हजार 150
देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – 49 हजार 948
देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या – 77 कोटी 43 लाख 10 हजार 567
देशातील एकूण लसीकरण – 1 कोटी 79 कोटी 13 लाख 41 हजार 295


हेही वाचा – Coronavirus Cases Today : भारतात 50 हजारांपेक्षा कमी कोरोनाचे सक्रिय रुग्ण; 24 तासात 3,993 नवे रुग्ण, 108 रुग्णांचा मृत्यू


First Published on: March 8, 2022 6:55 PM
Exit mobile version