नाशिक शहरात दिवसभरात ६५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह; ७ बाधितांचा मृत्यू

नाशिक शहरात दिवसभरात ६५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह; ७ बाधितांचा मृत्यू

नाशिकl जिल्हा प्रशासनास सोमवारी (दि.१५) दिवसभरात ८१ नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. यात नाशिक शहरातील ६५ रूग्णांचा समावेश आहे. नाशिक शहरात दोन दिवसांत ७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात खोडेनगर, महादेववाडी सातपूर, बुरुडगल्ली, पारिजातनगर, नाईकवाडीपुरा, खडकाळी, वडाळा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण करोनाबाधितांची संख्या २ हजार ६२ वर पोहोचली असून एकट्या नाशिक शहरात ७३८ करोनाबाधित रूग्ण आहेत. ७३८ पैकी २५९ रूग्ण करोनामुक्त, ३९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४४० रूग्णांवर उपचार सुरू आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभाग शहरात ११८ प्रतिबंधित क्षेत्र घोषित केली आहेत.

पाच पुरुष, दोन महिलांचा करोनामुळे मृत्यू
आवास व्हीला, खोडे नगर येथील ८० वर्षीय वृद्ध ४ जून रोजी करोनाबाधित आढळून आले. उपचार सुरू असताना रविवारी (दि.१४) त्यांचा मृत्यू झाला. महादेववाडी, सातपूर येथील ६० वर्षीय पुरुष करोनाबाधित असल्याचे अहवाल रविवारी (दि.१४) प्राप्त झाला आणि १४ जून रोजीच मृत्यू झाला. मुरुड गल्ली, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध महिला करोना बाधित असल्याचा अहवाल रविवारी (दि.१४) प्राप्त झाला होता. उपचार सुरू असताना सोमवारी (दि.१५) त्यांचा मृत्यू झाला. पारिजातनगर येथील ६० वर्षीय वृद्ध करोनाबाधित असल्याचा अहवाल सोमवारी (दि.१५) प्राप्त झाला. त्यांचा मृत्यूही सोमवारी झाला. खडकाळी येथील ६० वर्षीय पुरुष व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला होता त्यांचा मृत्यू रविवारी झाला. वडाळागाव येथील ६५ वर्षीय वृद्ध करोनाबाधित असल्याचा अहवाल रविवारी आला. त्यांचा रविवारी मृत्यू झाला. तर, काद्री चौक, अजमेरी मस्जिद, नाईकवाडीपुरा येथील ५२ वर्षीय महिला करोनाबाधित असल्याचा अहवाल ७ जून रोजी प्राप्त झाला. त्यांचा सोमवारी (दि.१५) मृत्यू झाला.

शहरातील रूग्ण 
पारिजातनगर १, पेठरोड ५, सारडा सर्कल १, आडगाव नाका १, वडाळा २, पखाल रोड १, आरटीओजवळ १, शनी मंदिर, म्हसरूळ १, बागवानपुरा ९, भक्तीनगर, कथडा २, जुने नाशिक ९, उपनगर १, जेलरोड २, आझाद चौक १, तपोवन १, पंचवटी १, हनुमानवाडी ३, वडाळा ३, कोणार्कनगर १. सावतानगर ३, रामनगर,पंचवटी २, व्दारका २, अशोका मार्ग १, कोकणीपुरा १, कापड बाजार १, घास बाजार १, खुटवडनगर १, फावडे लेन १, पखाल रोड १, नाशिक ३.

शहरात ६ नवीन प्रतिबंधित क्षेत्र, २ निर्बंधमुक्त
शहरात नवीन रूग्ण राहत असलेल्या इमारती खबरदारी म्हणून महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्या आहेत. जगताप मळा-नाशिकरोड, जाधव मळा-पिंपळगावखांब रोड, हनुमानवाडी, गोरेराम लेन, पांडवनगरी-इंदिरानगर, जनकनगरी-पंचवटी येथील इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्या आहेत. तर, १४ दिवसांत नवीन रूग्ण आढळून न आल्याने सुप्रभात सोसायटी, पेठरोड, पंचवटी , प्राईम पॉइंट, ड्रिम व्हॅली, शिंगाडा तलाव येथील इमारतीचे प्रतिबंधित क्षेत्र हटविण्यात आले आहे.

नाशिक करोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-२०६२
नाशिक ग्रामीण-३६१
नाशिक शहर-७३८
मालेगाव-८90
अन्य-७३
एकूण मृत – 129

First Published on: June 15, 2020 8:42 PM
Exit mobile version