VIDEO: रत्नागिरीच्या हर्णे बंदरात सापडला ९० किलोचा गोब्रा मासा

VIDEO: रत्नागिरीच्या हर्णे बंदरात सापडला ९० किलोचा गोब्रा मासा

९० किलोचा गोब्रा मासा

रत्नागिरी जिल्ह्यातील ताज्या माशांसाठी प्रसिद्ध असलेल्या हर्णे बंदरात मासेमाऱ्यांच्या जाळ्यात तब्बल ९० किलोचा गोब्रा जातीचा मासा सापडला आहे. गोब्रा जातीचा मासा साधारण ५ ते १० किलो वजनाचा असतो. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे हा मासा ५ फूट लांब आणि ९० किलो वजनाचा आहे. दापोली तालुक्यातील हर्डे बंदरामध्ये हा मासा सापडला आहे. ऐवढ्या मोठ्या आकाराचा गोब्रा मासा पहिल्यांदाच सापडल्यामुळे या मासा पाहण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. हर्डे बंदरावर आतापर्यंत ५ ते ८ किलो वजनाचाच गोब्रा मासा सापडला होता. ज्या मासेमाऱ्यांच्या जाळ्यात ९० किलो वजनाचा गोब्रा मासा अडकला त्या मासेमाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान स्थानिक मच्छिमारानी हा मासा विकत घेतला आहे.

First Published on: December 20, 2018 6:24 PM
Exit mobile version