२४ तासांत ९१ पोलीस कोरोनाबाधित; तर ९६९ पोलिसांची करोनावर मात

२४ तासांत ९१ पोलीस कोरोनाबाधित; तर  ९६९ पोलिसांची करोनावर मात

राज्यात कोरोना विषाणूचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या कोरोनाशी लढा देण्याकरता डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, या कोरोना विषाणूने आपला विळखा पोलिसांच्या भोवती अधिकच घट्ट केला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत राज्यातील ९१ पोलिसांना कोरोनाचीबाधा झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या २ हजार ४१६ इतकी झाली आहे. तर २६ पोलिसांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे तब्बल ९६९ पोलिसांनी कोरोनाचा पराभव केला आहे. तर सध्या १ हजार ४२१ कोरोनाबाधित पोलिसांवर सध्या उपचार सुरु आहेत.

२४ तासांत देशात ८ हजार ३८० नव्या रुग्णांची नोंद

देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. गेल्या चोवीस तासात आठ हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी मृतांची संख्याही पाच हजारांच्या पुढे गेली. गेल्या २४ तासांत देशात ८ हजार ३८० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १ लाख ८२ हजार १४३ वर पोहोचला आहे. तर मृतांची संख्या वाढून ५ हजार १६४ झाली आहे.


हेही वाचा – गेल्या २४ तासांत देशात ८ हजार ३८० नव्या रुग्णांची नोंद


 

First Published on: May 31, 2020 4:40 PM
Exit mobile version