मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जुन्नरमधील शेतकऱ्याने आयुष्य संपविले

मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जुन्नरमधील शेतकऱ्याने आयुष्य संपविले

पुणे(pune) जिल्ह्यामधील जुन्नर(junnar) तालुक्यातील एका शेतकऱ्याने एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डोक्यावर वाढलेल्या कर्जाला कंटाळून त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर 2022 रोजी वाढदिवस साजरा झाला. देश – विदेशातून मोदींना(pm narendra modi birthday) वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या. जुन्नरमधील या शेतकऱ्याने आत्महत्या कारण्यापूर्वी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दशरथ लक्ष्मण केदारी( farmer dashrath kedari) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.

दशरथ केदारी यांनी आत्महत्येपूर्वी एक चिट्ठी लिहिली त्यात त्यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव न दिल्याची खंतसुद्धा व्यक्त केली आहे. कांदा-टोमॅटोचे दिवसेंदिवस ढासळणारे दर, कोरोना आणि अतिवृष्टीचं संकट सोबतच फायनान्स कंपन्या आणि पतपेढी यांचे हफ्ता भरण्यासाठी सतत मागे लागणे यामुळे पुरता बेजार झाल्याने आत्महत्या आकारात आहे असं शेतकरी दशरथ यांनी चिट्ठीमध्ये नमूद केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दशरथ यांनी आत्महत्या केल्याने हळहळसुद्धा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा – शिंदे-फडणवीस स्वार्थी, स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी लाखो युवकांना बेरोजगार केलं, सुप्रिया सुळेंचा आरोप

दरम्यान शेतकरी दशरथ केदारी यांनी पात्रात लिहिल्याप्रमाणे ‘आम्ही भीक मागत नाही. अनेक संकटांचा सामना करत करत आम्ही शेतीत विविध पिके लावतो, शेती हा एक जुगाराचाच प्रकार आहे. यामुळेच मी जीवनाला कंटाळलो आहे आणि म्हणून मी आज आत्महत्या करतो आहे. आम्हाला (शेतकऱ्यांना) आमच्या हक्काचा बाजार भाव द्या, अशी मागणी आत्महत्या करताना दशरथ यांनी मोदी सरकारकडे केली. शेतकरी दशरथ(darmer dashrath kedari) यांनी पात्रात शेवटी लिहिताना मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.

दशरथ लक्ष्मण केदारी हे पुण्यातील जुन्नर(pune, junnar) तालुक्यात वडगाव या गावचे रहिवासी होते. त्यांच्या मालकीची एक दुचाकी आणि एक एकर शेती होती. अडीच लाखांचं कर्ज सुद्धा त्यांनी काढलं होतं. मे महिन्यात कांद्याचं पीक हाती आलं पण तेव्हा कांद्याचे दार मात्र 10 रुपये होते आणि त्या नंतर पावसाळा सुरु झाला आणि उत्पादनातील निम्मा कांडा खराब झाला. मात्र एवढं होऊनही त्यांनी टोमॅटो आणि सियाबीनचं पीक सुद्धा घेतलं.

हे ही वाचा – पुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली; खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ

पण पावसाचा फटका टोमॅटोच्या पिकाला बसला आणि टोमॅटो खराब झाला. त्यानंतर गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात सोयाबीनचे पीक सुद्धा खराब झाले. या पिकांचा पंचनामा करण्यात यावा यासाठी शेतकरी दशरथ 17 सप्टेंबर रोजी तलाठी कार्यालयात गेले. दोन तास तिथं बसून पंचनाम्याची मागणी करून घरी परतले. परंतु त्यानंतर दुपारच्या सुमारास आधी विष घेऊन आणि मग शेतातील तळ्यात उडी मारून शेतकरी दशरथ केदारी यांनी स्वतःचे आयुष्य संपविले.

हे ही वाचा – पुणेकरांचा रिक्षाप्रवास महागला; भाडेदरात 4 रुपयांची वाढ

 

First Published on: September 19, 2022 12:49 PM
Exit mobile version