घरताज्या घडामोडीपुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली; खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ

पुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली; खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ

Subscribe

खडकवासला धरण साखळीमध्ये सुरू असणाऱ्या पावसाच्या संततधारेमुळे धरणांमधील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुण्यात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागांत पाणी साचले आहे.

खडकवासला धरण साखळीमध्ये सुरू असणाऱ्या पावसाच्या संततधारेमुळे धरणांमधील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुण्यात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागांत पाणी साचले आहे. पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Water level of Mula Mutha River in Pune rises submerging Baba Bhide Bridge water released from Khadakwasla Dam)

पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवास धरणातून आज 22,880 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. परिणामी वाहतुकीला ब्रेक लागला आहे. रस्तांवर पाणी साचल्याने तासंतास वाहतुक कोंडी निर्माण झाली आहे.

- Advertisement -

शुक्रवारी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मावळमधील पवना आणि मुळशीतील मुळशी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने पवना धरणाच्या सांडव्याद्वारे 2100 क्युसेक व पॉवर आऊटलेट 1400 असे एकूण 3500 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन करण्यात आले असून, नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

पुण्यासह मुंबईतही मुसळधार पावसाने गुरूवारी रात्रीपासून हजेरी लावली आहे. पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे वाहतुक रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीलाही काहीसा ब्रेक लागला आहे. शिवाय, मुंबईच्या सखल भागांत पावसाचे पाणी साचल्याने चाकरमान्यांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला असून, सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा – उद्योगमंत्री कोण आहेत?; गद्दार…, आदित्य ठाकरेंची रत्नागिरीत टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -