एअर फोर्स हद्दीतील गवताला भीषण आग; अग्निशामक दलाचे 10 गाड्या दाखल

एअर फोर्स हद्दीतील गवताला भीषण आग; अग्निशामक दलाचे 10 गाड्या दाखल

ओझर येथील ऐअरफोर्स हद्दीतील ४० ते ५० एकर परिसरातील गवताला आग लागली. ही भीषण आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे दहा ते बारा बंब दाखल झाले. त्यांच्याकडून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते. अखेर रात्री उशिरा ही आग नियंत्रीत करण्यात यश आले. शुक्रवारी सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास ओझर एअर फोर्स स्टेशन हद्दीतील ४०ते ५० एकर जागेवरील गवताला आग लागली. त्वरीत अग्निशामक दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले असता एचएएल, पिंपळगाव, सिन्नर, नाशिक आदी ठिकाणचे अग्निशामक दलाचे दहा बंब व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

आग लागलेल्या जागेपासून जवळच विमानतळ आणि धावपट्टी असल्याने आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशामक दलाचे कर्मचारी यांच्याकडून सुरू होते. परंतू आग आटोक्यात येत नव्हती. वार्‍यामुळे आग पसरत गेली. घटनास्थळी ऐअरफोर्सचे अधिकारी तसेच एचएएलचे अधिकारी आणि निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, प्रांताधिकारी अर्चना पठारे आणि ओझर नगरपरिषदेचे कर्मचारी, ओझर पोलीस घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान, जवळच विमानतळ आणि विमानतळाची धावपट्टी असल्यामुळे प्रशासक सतर्क होते. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. आगीत अंदाजे ४० ते ५० एकर जमिनीवरील गवताला आग लागल्यामुळे गवत जळाले. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याबाबत एचएएल प्रशासनातील जबाबदार अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

धावपट्टीपासून दूर संरक्षक भिंतीलगत ही आग लागल्याने धावपट्टी तसेच एटीसीला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झालेला नाही. घटनास्थळी एचएएलच्या अग्निशामक दलाचे चार , नाशिक महापालिका यांच्याकडील दोन बंब आणि पिंपळगाव ग्रामपंचायतीचा एक बंब, येवल्याचा एक बंब, एयर फोर्सचे तीन बंब आणि सिन्नर नगरपालिका यांचे अग्निशामक दल व बंब यांनी आग विझविण्याचे काम केल्यामुळे रात्री साडेदहाला आग विझवण्यात यश आले.


हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेला झटका, माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

First Published on: May 6, 2022 10:59 PM
Exit mobile version