घरताज्या घडामोडीकल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेला झटका, माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेला झटका, माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Subscribe

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे निश्चित केले असून ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हा प्रवेश सोहळा आयोजित केल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदेसुद्धा उपस्थित होते.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हनुमान चालीसाचा फॉर्म्युला राज्यभरातील मनसैनिकांना दिला होता. या पार्श्वभूमीवर तणाव ग्रस्त वातावरण निर्माण झाले असतानाच कल्याण-डोंबिवलीतील मनसेच्या माजी नगरसेविका पूजा गजानन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य व मनसे तालुकाप्रमुख संजीव ताम्हणे, डोंबिवली शहर संघटक यांच्यासह काही शाखा अध्यक्ष तसेच मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवबंधन बांधून घेतलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत केलं आहे.

- Advertisement -

मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे माजी नगरसेवक प्रभाकर बामा पाटील हे देखील शिवसेनेत जाणार असल्याची कुणकुण आमदार पाटील यांना लागल्याने त्यांचा प्रवेश लांबणीवर पडणार असल्याचे बोलले जात आहे. माजी नगरसेवक प्रभाकर पाटील यांच्या घडामोडीवर खुद्द आमदार राजू पाटील लक्ष ठेवून आहेत.

एकीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुक जाहीर होण्याआधीच मनसेला चांगलीच गळती लागली असून सुभाष तुकाराम पाटील विभाग अध्यक्ष ,पांडे अण्णा उपसचिव, निशांत पाटील, भास्कर गांगुर्डे, विठ्ठल शिंदे हे मनसेचे शाखाध्यक्ष तसेच प्रवीण परदेसी मनसे विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष, तसेच संदीप मोरे हे विद्यार्थी सेनेचे शाखाध्यक्ष हे शिवबंधन यांनी बांधून घेतले आहेत.

- Advertisement -

मनसेचे डोंबिवलीतील हे पदाधिकारी गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या संपर्कात होते. गेल्या वर्षभरात शिवसेनेने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील विविध राजकीय पक्षांना झटका देऊन आतापर्यंत नऊ नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देत दणका दिल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा : राज ठाकरेंनी आतापर्यंत केलेली आंदोलन राज्याच्या नुकसानीची, भूमिकाही बदलल्या, अजित पवारांची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -