लोडशेडिंगच्या संकटात किंचित दिलासा, ऊर्जामंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर अदानीकडून ३ हजार मेगावॅटचा

लोडशेडिंगच्या संकटात किंचित दिलासा, ऊर्जामंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर अदानीकडून ३ हजार मेगावॅटचा

राज्यात भारनियमन होणार असल्याचा इशारा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. अदानीकडून वीज पुरवठा कमी झाल्यामुळे लोडशेडिंग करण्याची परिस्थिती आली असल्याचे नितीन राऊत यांनी म्हटलं होते. यानंतर आता अदानीकडून ३ हजरा मेगा वॅट वीज पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे भारनियमनाचे संकट किंचित कमी झाले आहे. करारापेक्षा कमी वीज पुरवठा करणाऱ्या अदानी कंपनीवर करारभंगाची कारवाई करण्याचा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिल्यानंतर अवघ्या २४ तासात अदानीने १ हजार ३११ मेगावॉटने वीज पुरवठा वाढवला आहे.

अदानी पॉवर कंपनीकडून शुक्रवारपासून १ हजार ७०० मेगावॅट वरून २ हजार २५० मेगावॅट वीज पुरवठा उपलब्ध होत असून आज मध्यरात्रीपासून एकूण ३ हजार ११ मेगावॅटपर्यंत वीजेची उपलब्धता होणार आहे. शिवाय महावितरणला महानिर्मितीकडून अतिरिक्त ७०० मेगावॉट वीज मिळणार असल्याने भारनियमनाच्या संकटात किंचित दिलासा मिळाला आहे. करारापेक्षा कमी वीज पुरवठा करणाऱ्या अदानी कंपनीवर करारभंगाची कारवाई करण्याचा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला होता. यामुळे अदानीने आता वीज पुरवठ्यात वाढ केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी ऊर्जा विभागाचा आढावा घेतला होता. खासगी वीज कंपन्यांना अतिरिक्त वीज निर्मिती करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच करार केल्यानुसार कंपन्या वीज पुरवठा करत नसतील तर अशा कंपन्यांना करारभंगाची नोटीस देण्यात येईल असे ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले आहे. विजेचे भारनियमन कमीत कमी करुन वीजग्राहकांना दिलासा देण्यासाठी महानिर्मिती आणि अदानीने महावितरणला अधिकची वीज उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देण्यात आली आहे.

विजेच्या उपलब्धततेनुसार मागणी आणि पुरवठा यातील तूट कमी झाल्यास राज्यातील भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार असून उन्हाच्या वाढत्या तापमानातील वीज संकटात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

ज्यात काही ठिकाणी भारनियमन सुरु

वाढते तापमान आणि विजेच्या वापरात झालेली वाढ यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई वगळता महावितरणच्या उर्वरित कार्यक्षेत्रात विजेची २४,५०० ते २५,००० मेगावॅट अशी अभूतपूर्व मागणी राहीली आहे. परंतु वीज खरेदीचा करार केलेल्या कंपन्यांकडून प्रामुख्याने कोळसा टंचाई तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे वीज कमी मिळत असल्याने सुमारे २,३०० ते २,५०० मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली होती. परिणामी राज्यात काही ठिकाणी भारनियमन सुरु करावे लागले आहे .

वीज निर्मिती कंपन्यांकडून अतिरिक्त वीज उपलब्धततेची ग्वाही

नितीन राऊत यांनी विजेची तूट भरून काढण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आणि कोणत्याही परिस्थितीत राज्यात किमान भारनियमन व्हावे यासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. विजेच्या तुटीची संभाव्य स्थिती पाहता महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आपात्कालिन नियोजन केले. यातून महानिर्मिती आणि अदानी या दोन्ही वीज निर्मिती कंपन्यांनी अतिरिक्त वीज उपलब्धततेची ग्वाही महावितरणला दिली आहे. त्यामुळे ऐन उन्हाच्या तडाख्यात नागरिकांना वीज संकटातून दिलासा मिळणार आहे.

वीज पुरवठा वाढला

अदानीकडून १ हजार ७०० मेगावॉटवरून ३ हजार ११ मेगावॉट वीज पुरवठा
महानिर्मिती ६ हजार ८०० मेगावॉटवरून ७ हजार ५०० मेगावॉटपर्यंत वीज उपलब्ध करणार


हेही वाचा : “मातोश्री”वर शिवसैनिकांचा पहारा; राणा दाम्पत्याला रोखण्याची तयारी  

First Published on: April 22, 2022 9:07 PM
Exit mobile version