मुख्यमंत्र्यांकडील खात्यांचा भार हलका, ‘या’ मंत्र्यांवर अतिरिक्त जबाबदारी

मुख्यमंत्र्यांकडील खात्यांचा भार हलका, ‘या’ मंत्र्यांवर अतिरिक्त जबाबदारी

संग्रहित छायाचित्र

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरही होऊ शकला नाही. त्यामुळे अनेक खात्यांसाठी मंत्रीच निवडले गेले नाहीत. परिणामी ही खाती बिनमंत्र्यांची राहिल्याने इतर मंत्र्यांवर याचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. म्हणजेच, पहिल्याच मंत्रिमंडळात ज्यांना मंत्रिपदे मिळाली आहेत त्यांच्या खांद्यावर आता अतिरिक्त खात्याच्याही भार देण्यात आला आहे.

हेही वाचा – राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला; अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीचा मुहूर्तही टळला

मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होण्याची चर्चा हिवाळी अधिवेशनाच्याही आधीपासून सुरू होती. परंतु, त्यानंतर आजपर्यंत मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होऊ शकलेला नाही. परिणामी मंत्रालयातील अनेक खात्यांना मंत्रीच मिळालेले नाहीत. एकट्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच १२ खाती दिली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा खाती आहेत. उर्वरित खाती पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अठरा मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहेत. अधिवेशनाच्या काळात सर्वच प्रश्नांची उत्तरे देण्याकरता खात्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भातील पत्र शिवसेनेने विधानपरिषद उपसभापतींना दिलं आहे.

कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती?

राज्यात 20 जून 2022 रोजी विधान परिषद निवडणुकीनंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष 10 आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला 29 जूनला पायउतार व्हावे लागले. लगेच दुसर्‍या दिवशी 30 जूनला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर जवळपास 39 दिवसांनी (9 ऑगस्ट 2022) मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला होता. यात भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी 9 मंत्री होते. साधारणपणे मंत्रिमंडळात 42 मंत्र्यांची वर्णी लागू शकते. त्यामुळे 22 मंत्र्यांची नियुक्ती अद्याप बाकी आहे.

First Published on: February 27, 2023 9:53 AM
Exit mobile version