शिंदे गटातील प्रवेशानंतर गजानन कीर्तिकरांची ठाकरे गटाकडून पक्षाच्या नेते पदावरून हकालपट्टी

शिंदे गटातील प्रवेशानंतर गजानन कीर्तिकरांची ठाकरे गटाकडून पक्षाच्या नेते पदावरून हकालपट्टी

शिवसेनेत उभी फुट पडल्यापासून ठाकरे गटातील एक-एक मंत्री, खासदार शिंदे गटात सामील होत आहेत. अशातच शुक्रवारी पुन्हा एका खासदाराने शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे खासदार आणि पक्षातील ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गटाला रामराम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. मात्र, गजानन कीर्तिकरांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरे गटानेही तातडीने त्यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षाच्या नेते पदावरून हकालपट्टी केली आहे. (after he left party and join shinde group shivsena uddahv balasaheb thackeray take action on mp gajanan kiritikar)

खासदार गजानन कीर्तिकरांनी ‘बाळासाहेंबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश करताच ठाकरे गटाने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ठाकरे गटाने कीर्तिकरांवर तातडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते पदावरून हकालपट्टी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, सचिव व खासदार विनायक राऊत यांनी पत्रक काढून गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई केली. राऊत यांनी पत्रक काढून कीर्तिकरांची थेट शिवसेना नेते पदावरुन हकालपट्टी केली आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील शिवसेना नेते पदावरुन गजानन कीर्तिकरांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याआदेशान्वये ही कारवाई करण्यात आल्याचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रावर, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांची सही आहे. तसेच, पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ही हकालपट्टी करण्यात येत असल्याचं या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.

खासदार गजानन कीर्तिकर यांच्या ‘बाळासाहेंबांची शिवसेना’ पक्षातील प्रवेशामुळे ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. सर्वप्रथम कीर्तिकर यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली त्यानंतर मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिरातील एका कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश केला. तसेच, त्यांचा प्रवेश आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे गटासाठी मोठा झटका मानला जात आहे.


हेही वाचा – ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; खासदार गजानन कीर्तिकरांचा शिंदे गटात प्रवेश

First Published on: November 12, 2022 7:53 AM
Exit mobile version