सरकार कोसळले अन् बच्चू कडूंना ‘त्या’ प्रकरणात मिळाली क्लीन चिट

सरकार कोसळले अन् बच्चू कडूंना ‘त्या’ प्रकरणात मिळाली क्लीन चिट

बच्चू कडू

एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे सरकार अल्पमतात आले होते. यानंतर उद्धव ठाकरेंनी काल (बुधवारी) राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. दरम्यान सरकार कोसळले अन् तिकडे बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणात क्लीन चिट मिळाली.

अकोल्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडूंना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातून क्लीनचीट मिळाली आहे. अस्तित्वात नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी 95 लाखांच्या गैरव्यवहाराचा केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. वंचित बहूजन आघाडीने केलेल्या तक्रारीनंतर त्यांच्यावर आरोप झाले होते. हे प्रकरण कोर्टात दाखल होते. सिटी कोतवाली पोलिसांत बच्चू कडूंवर फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेले होते. संपुर्ण प्रकरणात पुरावे नसल्याने प्रकरणच तथ्यहिन असल्याचे पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या प्रकरणाची फाईल पोलिसांनी बंद केली आहे.

काय आहे आरोप –

वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर आर्थिक अपहाराचे गंभीर आरोप केले होते. पालकमंत्री बच्चू कडूंनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी वळता करत 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचित आघाडीने केला होता. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली रस्त्यांची कामे पालकमंत्री कडूंनी डावलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला डावलत आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामे नियमबाह्यपणे करवून घेतल्याचा आरोप वंचितने केला. यातील दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. या तीन रस्त्यांच्या कामांत बच्चू कडूंनी एक कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितने केला होता.

First Published on: June 30, 2022 9:09 AM
Exit mobile version