Ambadas Danve : ‘एक फूल दोन हाफ’ म्हणत अंबादास दानवेंनी एसआयटीसाठी दिली यादी…

Ambadas Danve : ‘एक फूल दोन हाफ’ म्हणत अंबादास दानवेंनी एसआयटीसाठी दिली यादी…

लोकसभा निवडणूक लढवण्याची अंबादास दानवे यांनी व्यक्त केली इच्छा

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा ‘एक फूल दोन हाफ’ असा उल्लेख करत, एसआयटी चौकशीसाठी विविध घटनांची यादीच अंबादास दानवे यांनी दिली आहे.

हेही वाचा – Vijay Wadettiwar : “होऊ दे खर्च”; मोदींसाठी 12 कोटींचा चुराडा; वडेट्टीवारांचे टीकास्त्र

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत अपशब्दांचा वापर केला. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली असता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या मागणीला मान्यता दिली.

यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मराठा आंदोलन भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये शिरेना म्हणून चौकशी सुरू केली आहे. एसआयटी नेमण्यासाठी अजून काही विषय आहेत. प्रक्षोभक भाषणावर कारवाई होऊ शकते, मग गोळ्या झाडणाऱ्यांचीही चौकशी व्हायला हवी, असे सांगत त्यांनी विविध प्रकरणे दिली आहेत.

हेही वाचा – Sanjay Raut : “अमित शाहांचे वक्तव्य हास्यास्पद”, परिवारवादाच्या मुद्द्यावरून राऊतांचा टोला

हेही वाचा – PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर; 45 एकरात उभारला सभामंडप

First Published on: February 28, 2024 11:38 AM
Exit mobile version