घरमहाराष्ट्रVijay Wadettiwar : "होऊ दे खर्च"; मोदींसाठी 12 कोटींचा चुराडा; वडेट्टीवारांचे टीकास्त्र

Vijay Wadettiwar : “होऊ दे खर्च”; मोदींसाठी 12 कोटींचा चुराडा; वडेट्टीवारांचे टीकास्त्र

Subscribe

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींचा यवतमाळ दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच या दौऱ्यात यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे महिला बचत गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी 45 एकरामध्ये सभामंडप उभारण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमासाठी झालेल्या खर्चावरून आता विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत. (Let it be spent 12 Crore Churada for Narendra Modi Criticism by Vijay Wadettiwar)

हेही वाचा – Sanjay Raut : “अमित शाहांचे वक्तव्य हास्यास्पद”, परिवारवादाच्या मुद्द्यावरून राऊतांचा टोला

- Advertisement -

हेही वाचा – Manoj Jarange : “रडीचा डाव खेळू नका”, जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 1 दिवसाच्या कार्यक्रमासाठी जनतेच्या 12 कोटी 73 लाख रुपयांचा चुराडा महायुती सरकार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही तासांच्या कार्यक्रमासाठी खर्च केलेल्या इतक्या सरकारी निधीत यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब पुन्हा नव्याने उभे राहू शकले असते. आधीच राज्याच्या डोक्यावर 8 लाख कोटींहून अधिक कर्ज झाले आहे. त्यात आर्थिक शिस्त न पाळणारे राज्यकर्ते सत्तेत आहेत. पंतप्रधानांचा कार्यक्रम असो की शासन आपल्या दारी असो आपली जाहिरात आणि प्रचार झालाच पाहिजे ‘होऊ दे खर्च’ या सूत्राचे पालन करत महायुतीची उधळपट्टी सुरू आहे, अशी सडकून टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Vijay Wadettiwar : “मोदींची गॅरंटी” कधीही पूर्ण न होणारी; ‘चाय पे चर्चेचा’ संदर्भ देत वडेट्टीवारांची टीका

सभामंडप उभारणीसाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातून मजूर

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्यातील भारी शिवार याठिकाणी येणार असल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. या सभेच्या अनुषंगाने सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री उशिरापर्यंत 500 हून अधिक मजूर सभामंडप उभारणीचे काम करताना पाहायला मिळाले. विशेष म्हणजे यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातील म्हणजे आग्रा, राजस्थान, हैदराबाद आदी राज्यातील शेकडो मजूर काम करत आहेत. सभेच्या तयारीसाठी वेगवेगळ्या 30 समित्या गठित करण्यात आल्या होत्या. ज्यात सर्वांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे अनेक मंत्री आणि नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे 7 हेलिपॅडची निर्मिती जवळच असलेल्या विमानतळावर करण्यात आली असून रस्त्याचे काम सुद्धा करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -