घरदेश-विदेशPM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर; 45 एकरात उभारला सभामंडप

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर; 45 एकरात उभारला सभामंडप

Subscribe

यवतमाळ जिल्ह्यातील भारी शिवार येथे पंतप्रधान मोदींच्या सभेची अनेक दिवसांपासून तयारी सुरू आहे. या कार्यक्रमासाठी 45 एकरामध्ये सभामंडप उभारण्यात आला आहे.

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींचा यवतमाळ दौरा महत्त्वाचा मानला जातो. या दौऱ्यात यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे महिला बचत गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पीएम किसान योजना 16 व्या हफ्त्याचे मोदींच्या हस्ते वितरण होणार आहे. यवतमाळमधील पंतप्रधान मोदींची सभा ही दुपारी 4 वाजता होणार आहे.

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदीसह अनेक मोठे नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून अडीच लाख महिलांची उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील भारी शिवार येथे पंतप्रधान मोदींच्या सभेची अनेक दिवसांपासून तयारी सुरू आहे. या कार्यक्रमासाठी 45 एकरामध्ये सभामंडप उभारण्यात आला आहे. या सभा मंडप उभारणीसाठी हा सभामंडप बांधण्यासाठी राजस्थान, आग्रा, हैदराबाद देशातील इतर राज्याती शेकडी मजूर काम करत होते. या सभेच्या तयारीसाठी वेगवेगळ्या अशा 30 समित्या गठित करण्यात आल्या आहेत. त सर्वांना वेगवेळ्या जबाबदारी देण्यात आली आहेत. या कार्यक्रमासाठी अनेक मंत्री यवतमाळमध्ये हजेरी लावणार आहेत. या पार्श्वभूमीवर विमानतळाजवळ असलेल्या 7 हेलिपॅड तयार करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Manoj Jarange : “रडीचा डाव खेळू नका”, जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

असा आहे पंतप्रधान मोदींचा यवतमाळ दौरा ?

  • पंतप्रधान मोदी हे दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी नागपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणार आहेत.
  • विमानतळावरून पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरने जवाहरलाल दर्डा एअरस्ट्रीप हेलिपॅडकडे रवाना होतील आणि दुपारी 4.45 वाजता पोहोचतील.
  • पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे. यावेळी मोदींच्या हस्ते पावणेसहा वाजेपर्यंत विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण होणार आहेत.
  • यवतमाळच्या जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
  •  पंतप्रधान ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ चा सुमारे 3,800 कोटी रुपयांचा दुसरा व तिसरा हप्तादेखील येणार आहे. यामुळे 88 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यानंतर पंतप्रधान मोदी उपस्थितांना संबोधित करतील.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -