घरमहाराष्ट्रSanjay Raut : "अमित शाहांचे वक्तव्य हास्यास्पद", परिवारवादाच्या मुद्द्यावरून राऊतांचा टोला

Sanjay Raut : “अमित शाहांचे वक्तव्य हास्यास्पद”, परिवारवादाच्या मुद्द्यावरून राऊतांचा टोला

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिवारवादाच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीवर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला आता खासदार संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिवारवादाच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीतील पक्षांवर परिवारवादाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. हे सगळेजण आज एकवटले आहेत, कारण यांना राजकारण करुन कुटुंबाचे भले करायचे आहे, या आशायचे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांना कोणत्या कारणामुळे बीसीसीआयचा अध्यक्ष केला आहे, असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे. (Sanjay Raut’s response to Amit Shah’s criticism on the issue of nepotism)

हेही वाचा… PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर; 45 एकरात उभारला सभामंडप

- Advertisement -

प्रसार माध्यमांनी संजय राऊत यांना अमित शहा यांच्या टीकेबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, अमित शहा इंडिया आघाडीत घराणेशाही आहे, असे ते म्हणत असतील तर त्यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. घराणेशाही इंडिया आघाडीत नाही तर भाजपात आहे. कारण जय शहाने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारले आहेत का? सचिनपेक्षा जास्त शतके ठोकली आहेत का? की त्यांनी कपिल देवपेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत? असा टोलाच राऊतांनी लगावला आहे.

तर, जय शहा यांना बीसीसीआयचे अध्यक्ष का करण्यात आले? अमित शाह गृहमंत्री नसते तर जय शाह हे बीसीसीआयमध्ये असते का? असा प्रश्न उपस्थित करत राऊत म्हणाले की, घराणेशाही म्हटले जाते तेव्हा घराण्याची प्रतिष्ठा आहे. ठाकरे घराण्याला प्रतिष्ठा आहे. या प्रतिष्ठेचा फायदा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही झाला आहे. आम्ही स्वार्थाचे राजकारण करत नाही. शरद पवारांची घराणेशाही आहे का? त्यांनी कृषी क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम केले आहे. त्यासाठी त्यांचा गौरव यांच्याच सरकारने केला आहे. घराणेशाही जर कोणी वाढवली असेल तर तो भाजपा आहे. ज्याला कुटुंब असते तेच घराणेशाहीच्या गोष्टी बोलतात, असेही राऊतांनी सुनावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -