एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर अमृता फडणवीसांचा ट्विटवरून मुख्यमंत्र्यांना टोला

एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर अमृता फडणवीसांचा ट्विटवरून मुख्यमंत्र्यांना टोला

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांनी बंड केले. एकनाथ शिंदे सध्या सुरतच्या एका हॉटेलमध्ये असून, त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदारसोबत आहेत. त्यामुळे शिवसेनेत (Shiv Sena) मोठी फुट पडण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु, एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येत आहेत. अशातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी टोला लगावला आहे. ट्विटरच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. (Amruta Fadnavis tweet on Chief Minister after After Eknath Shinde revolt)

अमृता फडणवीस यांनी “एक ‘था’ कपटी राजा…”, असे लिहीले आहे. परंतु, अमृता फडणवीस यांनी ट्विट केल्यानंतर काही वेळेतच डिलीट केले. त्यांच्या या ट्विटनंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस यांच्यात नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्ष भाजपकडून बघ्याची भुमिका

दरम्यान, राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या या घडामोडींवर विरोधी पक्ष भाजपकडून बघ्याची भुमिका घेतली जात आहे. त्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या कथित बंडानंतर राज्यातील कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले असून सध्या एकनाथ शिंदे यांची समजूत घालण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शिवसेनेकडून केले जात आहेत. एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर काही वेळापूर्वी सुरतमध्ये पोहोचले होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून जवळपास ४० मिनिटं त्यांच्याशी चर्चा केली.

हेही वाचा – “परत जाऊ नका…”; एकनाथ शिंदेंचे ट्विट रिट्वीट करत ‘या’ अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया

महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ३८ आमदार असल्याने राज्यात आता सत्ता परिवर्तन होणे अटळ असल्याचे बोलले जाते. भाजपच्या (BJP) नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन होऊ शकते. शिवसेनेच्या (shiv sena) एकूण ५५ आमदारांपैकी एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३८ आमदार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शिवसेनेकडे अवघे १२ ते १५ आमदार असतील. सरकारमधील एवढ्या मोठ्या संख्येने आमदार कमी झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार बहुमताअभावी टिकण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत तीन शक्यता वर्तवल्या जात आहे.


हेही वाचा – भाजपकडून राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी

First Published on: June 21, 2022 10:04 PM
Exit mobile version