घरदेश-विदेशभाजपकडून राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी

भाजपकडून राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी

Subscribe

भाजपने राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपने द्रौपदी मुर्मू यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी घोषीत केले आहे. याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी माहिती दिली. हा निर्णय भाजपच्या मुख्यालयात झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

भाजपच्या बैठकीला पंतप्रधान मोदींशिवाय पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी आपला संयुक्त उमेदवार जाहीर केला आहे. टीएमसीचे माजी नेते आणि केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना विरोधकांनी उमेदवार म्हणून उभे केले आहे. तर भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे.

- Advertisement -

द्रौपदी मुर्मू यांचा राजकीय प्रवास – 

द्रौपदी मुर्मू ह्या 2015 मध्ये झारखंडच्या राज्यपाल बनल्या. त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. त्या 2000 ते 2004 पर्यंत ओडिशा विधानसभेत रायरंगपूरच्या आमदार होत्या आणि राज्य सरकारमध्ये मंत्री होत्या. भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दलाच्या युती सरकारमध्ये त्या 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 पर्यंत स्वतंत्र प्रभारासह वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री होत्या. तसेच  6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004 पर्यंत त्यांनी मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री भुषवले.

- Advertisement -

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -