दिल्लीतील सीबीआय चौकशीवरून शेलारांनी ठाकरेंना घेरलं; केजरीवालांच्या भेटीबाबत मोठं विधान

दिल्लीतील सीबीआय चौकशीवरून शेलारांनी ठाकरेंना घेरलं; केजरीवालांच्या भेटीबाबत मोठं विधान

Ashish Shelar Tweet on Uddhav Thackeray | मुंबई – देशाची राजधानी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना न्यायालयाने ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावणी आहे. दिल्ली Excise Policy घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई झाली असून याचे धागेदोरे महाराष्ट्रपर्यंत असल्याचा संशय भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे. एवढंच नव्हे तर या घोटाळ्यासंदर्भात चर्चा करण्यासाठीच उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्यात भेट झाली का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीच्या काळात विदेशी दारुवरील कर माफ करण्यात आला होता. बार, पबच्या परवाना शुल्कात सवलत देण्यात आली होती, किराणा दुकनात वाईन विकण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या सर्व मुद्द्यांचा आशिष शेलार यांनी समाचार घेतला असून ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – ठाकरेंचा पक्ष, चिन्ह चोरले; अरविंद केजरीवाल यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

आशिष शेलार म्हणाले की, ज्या पद्धतीने दिल्लीत मनिष सिसोदिया यांनी दारुवाल्यांवर खैरात केल्याचा आरोप आहे,
तशीच खैरात त्याच काळात महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकारने केली होती. विदेशी दारुवरील कर माफ, बार, पबच्या परवाना शुल्कात सवलत, वाईन किराणा दुकानात विकण्यास परवानगी. दिल्लीत सुरु असलेल्या सीबीआय चौकशीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत?,महाराष्ट्रात पण जी सवलतींची खैरात झाली त्याच्या फाईल ओपन होणार?, म्हणूनच श्री.अरविंद केजरीवाल भेटीसाठी आले?, दारुवाल्यांचे तत्कालीन ठाकरे सरकार संशयाच्या घेऱ्यात? असे विविध प्रश्न त्यांनी ट्वीटद्वारे उपस्थित केले आहेत.


दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर, लगेच दुसऱ्या दिवशी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांच्या भेटीमागे नेमकं काय कारण आहे, ही भेट आप-ठाकरे गट युतीच्या संदर्भात झाली की मनीष सिसोदिया यांच्यावर सुरू असलेल्या करावाईसंदर्भात झाली होती, असे प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केले जात आहे.

हेही वाचा – यावरून हेच सिद्ध होते;, उद्धव ठाकरे-केजरीवाल भेटीवरून नितेश राणेंची टीका

मनीष सिसोदिया यांना चार मार्चपर्यंत कोठडी

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना तेथील स्थानिक न्यायालयाने ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. दिल्ली Excise Policy घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने रविवारी सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशी केल्यानंतर सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली. कोठडी घेण्यासाठी सीबीआयने सोमवारी सिसोदिया यांना न्यायालयात हजर केले.

हेही वाचा – मनीष सिसोदियांना ठोठावली पाच दिवसांची सीबीआय कोठडी

First Published on: February 28, 2023 9:09 AM
Exit mobile version