घरमहाराष्ट्रयावरून हेच सिद्ध होते..., उद्धव ठाकरे-केजरीवाल भेटीवरून नितेश राणेंची टीका

यावरून हेच सिद्ध होते…, उद्धव ठाकरे-केजरीवाल भेटीवरून नितेश राणेंची टीका

Subscribe

मुंबई : आम आदमी पार्टीचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काल, शुक्रवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अरविंद केजरीवाल आणि आप नेते भगवंत मान हे शुक्रवारी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकार काही उद्योगपतींचा फायदा होण्यासाठी देश गहाण ठेवत आहे. देशातील सर्व संस्थांची विक्री करत आहे. देशातील युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यातच महागाई देखील प्रचंड वाढली आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली.

- Advertisement -

मागील काही दिवसांत महाराष्ट्रात खूप घडामोडी घडल्या असून अद्याप घडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची चोरी झाली. त्यांचे चिन्ह आणि नाव चोरी करण्यात आले. उद्धव ठाकरे यांचे वडील वाघ होते. उद्धव हे त्या वाघाचे पुत्र आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा मोठा विजय होणार आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत या केजरीवाल आणि ठाकरे भेटीवर टीका केली आहे. ‘आधी मुंबई बॅाम्बस्फोटातील आरोपींचे समर्थन करणाऱ्यांसोबत मुख्यमंत्री झाले. आता खलिस्तानवाद्यांचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्याला भेटतात. यावरून हेच सिद्ध होते जन्माने संपत्तीत वारसा मिळतो; पण आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मिळवता येत नाही,’ असे म्हणत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -