मोठी बातमी! आशिष शेलार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार?, चंद्रकांतदादा कॅबिनेटमध्ये

मोठी बातमी! आशिष शेलार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार?, चंद्रकांतदादा कॅबिनेटमध्ये

मुंबईः महाराष्ट्र भाजपमध्ये लवकरच मोठे फेरबदल होणार असून, भाजप आमदार आशिष शेलार यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील भाजपचा महत्त्वाचा चेहरा म्हणून आशिष शेलार यांची ओळख आहे. तसेच भाजपमधील मराठा नेते म्हणूनही ते परिचित आहेत. सध्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या जागी मराठा नेत्याकडेच प्रदेशाध्यक्षपद राहावे, अशी भाजपच्या श्रेष्ठींची इच्छा आहे.

त्याच पार्श्वभूमीवर भाजपमधील चंद्रकांत पाटलांनंतर मराठा चेहरा असलेल्या आशिष शेलार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आशिष शेलारांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी अतिशय सलोख्याचे आणि उत्तम संबंध आहेत. त्यामुळे पक्षाच्या बांधणी आणि वाढीसाठी आशिष शेलारांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा भाजपला नक्कीच फायदा होऊ शकतो. 2014 ला देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा काही काळ आशिष शेलार यांनी शिक्षणमंत्री पदही भूषवलं होतं. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांना हटवून आशिष शेलार यांना राज्याचे शिक्षणमंत्री करण्यात आले होते.

मुंबई महापालिकेतही आशिष शेलार यांचा चांगलाच दबदबा आहे. आता येत्या काही दिवसांत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्या निवडणुकीतही आशिष शेलारांचा भाजपला फायदा होण्याचा अंदाज आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न अधांतरी असतानाच भाजपचे शिंदे गटाचे मराठा मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना संधी दिली. आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदीही मराठा नेत्याच्या रूपात आशिष शेलारांना स्थान मिळण्याची चर्चा आहे.

दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार, संजय कुटे या ओबीसी नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. प्रवीण दरेकर, राम शिंदे, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत या देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या आमदारांनाही मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. तसेच मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या नेत्यांना तातडीने फोन करून मुंबईत बोलावण्यात आलं आहे. भाजपकडून राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील यांना फोन करण्यात आले आहेत. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय शिरसाट, संदिपान भुमरे, भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनाही फोन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात सर्वाधिक विधानसभेचे आमदार पाहायला मिळणार आहेत.


हेही वाचाः मोठी बातमी! जनतेतून निवडून आलेल्यांनाच शिंदे कॅबिनेटमध्ये संधी?

First Published on: August 8, 2022 6:24 PM
Exit mobile version