धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

धनंजय मुंडे

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे फडणवीस सरकारच्या शेवटच्या अधिवेशनाच्या तोंडावर एकमात्र विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील याआधीच आपल्या पदाचा राजीनामा देऊन मनातून भाजपवासी झालेले आहेत.

प्रकरण काय आहे?

धनंजय मुंडे यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करून बेलखंडी मठाला दिलेली जमीन जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. या प्रकरणात याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. कायद्यानुसार इनाम दिलेल्या जमिनीची विक्री करता येत नाही. फड यांनी तक्रार दाखल करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यानंतर आज हायकोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय दिला आहे.

हे वाचा – ‘माझ्यावर सूडबुद्धीने कारवाई, सुप्रिम कोर्टात दाद मागणार’ – धनंजय मुंडे

 

First Published on: June 11, 2019 1:19 PM
Exit mobile version