आयर्लंडच्या पंतप्रधानांनी घेतल्यानी कोकणातल्या जेवणाचो आस्वाद

आयर्लंडच्या पंतप्रधानांनी घेतल्यानी कोकणातल्या जेवणाचो आस्वाद

आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर

भारतीय वंशाचे आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांनी आपल्या मूळ गावी आले होते. दरम्यान, त्यांचे वराडमधील गावकऱ्यांनी जंगी स्वागत केले. ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा मुहूर्त साधत डॉ. लिओ वराडकर आपल्या मूळ गावी आले होते. यांच्यासोबत वडील डॉ. अशोक वराडकर, आई मेरिअम, बहीण सोफिया, सोनिया, एरीक, जॉन, त्यांची मुले आदि उपस्थित होते. तर सुवासिनींनी त्यांना ओवाळून त्यांचे स्वागत केले. दरम्यान, त्यांनी आपल्या घरी आल्यावर कोकणातल्या जेवणाचा आस्वाद देखील घेतला.

काय होती जेवणाची मेजवानी

डॉ. लिओ वराडकर यांनी मालवणी चिकनचा आस्वाद घेतला आहे. यामध्ये त्यांनी भात, चपाती, आंब्याचे लोणचे आणि खोबऱ्याची चटणीसह मासे अशा विविध मालवणी मेजवानीचा त्यांनी आस्वाद घेतला.

अशी केली गावात सफर

२८ डिसेंबर रोजी डॉ. लिओ वराडकर हे मालवणात दाखल झाले होते. त्यांनी गावात आगमन करताच संपूर्ण गावकऱ्यांनी त्यांना घेरले आणि त्यांचे स्वागत केले. गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, भारतात मी पाच वेळा आलो होतो. मात्र, माझे आजोबा, वडिल राहत असलेल्या वराड गावी येण्याचा योग पहिल्यांदाच आला असून गावात येऊन मला अतिशय आनंद झाला आहे. विशेष म्हणजे माझे आडनाव या गावाशी जोडले आहे, याचाही आनंद असून आम्ही वराडकर कुटुंबीय गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू, असे देखील ते यावेळी पुढे म्हणाले.

त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांसह गावात एक फेरफटका देखील मारला. त्यावेळी त्यांनी कोणतीही सुरक्षा घेतली नव्हती. विशेष म्हणजे साधे शर्ट आणि पँट यामध्ये त्यांनी प्रत्येकाला हस्तआंदोलन करत गावकऱ्यांची भेट घेतली.


हेही वाचा – ठाकरे सरकारमध्ये महिलांना एक टक्क्याहून कमी स्थान; वाचा संपुर्ण मंत्रिमंडळाची यादी


 

First Published on: December 30, 2019 5:52 PM
Exit mobile version