“अकाऊंट लॉक” करण्यासाठी केंद्र सरकारचे ट्विटरवर दबावतंत्र, बाळासाहेब थोरात यांचा आरोप

“अकाऊंट लॉक” करण्यासाठी केंद्र सरकारचे ट्विटरवर दबावतंत्र, बाळासाहेब थोरात यांचा आरोप

काँग्रेसच्या मुख्य ट्विटर अकाऊंटसह ५ बड्या काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आलं आहेत. काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचे मागील आठवड्यात ट्विटर अकाऊंट तात्पुरते लॉक करण्यात आले होते. यानंतर काँग्रेसचं डिजिटल आईएनसी चॅनलच्या ट्विटर अकाऊंटवर कारवाई करण्यात आली होती. राज्यातील महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं देखील ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आलं आहे. अकाऊंट लॉक करण्यासाठी केंद्र सरकार ट्विटरवर दबावतंत्र वापरत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. आमचा लढा सुरुच ठेवणार असल्याचा आक्रमक पवित्रा बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे.

काँग्रेसचं मुख्य ट्विटर अकाऊंटही लॉक करण्यात आलं आहे. काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचे अकाऊंट लॉक करण्यात आलं आहे. राहुल गांधीच्या ट्विटला समर्थन केल्यामुळे माझ्या अकाऊंटलाही लॉक करण्यात आलं आहे. हा सगळा प्रकार लोकशाहिच्या विरोधात आहे. विचार स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेला अधिकार आहे. या अधिकाराला अबाधित ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. ट्विटरनं अकाऊंटल लॉक केले यामध्ये ट्विटरचा दोष आहेच मात्र यापेक्षा जास्त दोष भाजप आणि केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकार ट्विटरवर अकाऊंट लॉक करण्यासाठी दबाव आणत आहे. असा घणाघात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या अकाऊंटवर कारवाई का?

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ट्विटर अकाऊंटवर कारवाई करुन लॉक करण्यात आलं आहे. खासदार राहुल गांधी यांच्या भूमिकेला बाळासाहेब थोरात यांनी पाठिंबा दिला आहे. पाठिंबा दर्शवत थोरात यांनी मै भी राहुल असे ट्विट केले होते. राहुल गांधी यांनी नियमांचे उल्लंघन करणारा फोटो पोस्ट केल्यामुळे ट्विटरनं कारवाई केली आहे. त्याच फोटोवर थोरात यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे बाळासाहेब थोरात यांचे अकाऊंट लॉक करण्यात आलं आहे.

ट्विटर ही आंतरराष्ट्रीय कंपनी असून भाजपच्या दबावाखाली काम करत आहे. नागरिकांच्या गळचेपी करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. या कृतीचा आम्ही निषेध करत असून आमचा लढा सुरुच ठेवणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

First Published on: August 12, 2021 1:48 PM
Exit mobile version