Live updates : खंडाळा घाटात कोल्हापुरकडे जाणाऱ्या ट्रकला अपघात

Live updates : खंडाळा घाटात कोल्हापुरकडे जाणाऱ्या ट्रकला अपघात

Live update Mumbai Maharashtra

खंडाळा घाटात कोल्हापुरकडे जाणाऱ्या ट्रकला अपघात

ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने घडला अपघात

अपघातामुळे खंडाळा घाटात वाहतूक कोंडी


कल्याणच्या गोदरेज हिल परिसरात बस उलटल्याने अपघात

बस चालक जखमी असल्याची प्राथमिक माहिती


निर्मल लाईफस्टाईलचे बिल्डर धर्मेश जैन आणि राजीव जैन यांना 3 मेपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई


पाकिस्तानच्या कराची एक्सप्रेसमध्ये लागली आग

तीन लहान मुलांसहित सात लोकांचा मृत्यू

कराची एक्सप्रेसच्या बिजनेस क्लास डब्ब्यात लागली आगव


विदर्भ, मराठवाड्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता

विदर्भ, मराठवाड्याला हवामान विभागाकडून आॅरेंज अलर्ट

पुण्यात देखील पावसाच्या तुरळक सरींची शक्यता


अजित पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्याची पत्रातून मागणी


उद्धव ठाकरे लवकरच बारसू गावाला भेट देण्याची शक्यता

विनायक राऊतांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली माहिती


किसान सभेचा लाँग मार्च मागे

अकोले ते लोणीपर्यंत शेतकरी करणार होते लाँग मार्च


बारसू रिफायनरी विरोधकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत चर्चा केली

मातोश्री या निवासस्थानी विरोधकांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.


दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातील सदानंद कदमांच्या न्यायालयीन कोठडी वाढ

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरण – सदानंद कदमांच्या न्यायालयीन कोठडी वाढ करण्यात आली आहे.  सदानंद कदमांच्या ११ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ झाली


हसन मुश्रीफ यांच्या पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून सुटका मिळाली आहे.


मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात

मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघाता ११ वाहाने एकमेकांवर धडकील आहे. यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईकडे येणाऱ्या वारतुकीवर परिणाम झाला आहे.


भारतीय कामगार सेनेच्या प्रमुख सल्लागारपदी उद्धव ठाकरेंची निवड

भारतीय कामगार सेनेच्या प्रमुख सल्लागार पदी उद्धव ठाकरेंची निवड करण्यात आली. तर अरंविद सावंत यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकरांनी मांडलेला ठराव मंजूर करण्यात आला आहे. भारतीय कामगार सेनेचे ५५ वी सभा सुरू आहे.


स्वयंमसेवक असं काम करतात, तेव्हा अभिमान वाटतो – सरसंघाचालक मोहन भागवत

स्वयंमसेवक असे काम करतात, तेव्हा अभिमान वाटतो. संकल्प करून काम केल्यास सर्व शक्य असे, असे विधान आएसएसचे सरसंघाचालक मोहन भागवत यांनी नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूच्या लोकार्पण वेळी केलेआहे.


अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांची भेट

अजित पवार यांनी हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे.


नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूचा उद्घाटन सोहळा

मध्य भारतासाठी महत्त्वाचे कॅन्सर रुग्णालय असल्याचे बोलले जाते. या रुग्णालयामुळे विदर्भ आणि मध्य प्रदेशातील रुग्णांसाठी मोठी सोय होईल. सरसंघाचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित आहे.


मुंबईतील पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थी आक्रमक; शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालायतील शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थांचा बळी गेला आहे. या विद्यार्थ्याचा मृत्यूवरून पडून दुखापत झाली आहे.  पोद्दार रुग्णालयाची ओपीडी बंद असल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.


संजय राऊत सत्यपाल मलिकांची भेट घेणार

दिल्लीत संजय राऊत हे सत्यपाल मलिकांची आज दुपारी १२ वाजता भेट घेणार आहे. पुलवामाबद्दलच्या आरोपानंतर संजय राऊत हे सत्यपाल मलिकांची भेट घेणार आहे.


सह्याद्री अतिथीगृहावर कॅबिनेटमंत्र्यांची तातडीची बैठक

किसान सभेच्या मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणीतील कर्यालयावर विविधी मागण्यासांठी मोर्चा काढण्यात आला आहे. उन्हाचा वाढता पारा पाहात पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तरी देखील किसान सभा मोर्चावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सह्याद्री अतिथीगृहावर तातडीची बैठक बोलविली आहे.


रिफायनरी विरोधक आणि प्रशासनाची आज बैठक

बारसू रिफायनरीला स्थानिकांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आज रिफायनरी विरोधक आणि प्रशासनामध्ये बैठक होणार आहे. या बैठकीनंतर रिफायनरीला विरोध करणारे स्थानिक त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत. यामुळे रिफायनरीसंदर्भातील ही बैठक महत्वाची मानली जाते.


राज्यात आज पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

राज्यात आज विदर्भात ठिक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता. तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक आणि पुण्यात गारपिटीचा इशारा ही हवामान विभागाने दिला आहे.


अमित शाह यांचा नागपूर दौरा रद्द

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचा राष्ट्रीय दुखवटा असल्या कारणाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसीय नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे.


धक्कादायक! मुंबईत एका महिला उपनिरीक्षकाचा मृतदेह तिच्याच घरात आढळून आल्याने खळबळ

मुंबईतील नेहरू नगर येथील महिला उपनिरीक्षकाचा मृतदेह तिच्याच घरात आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एडीआरचा गुन्हा दाखल केला आहे. महिला उपनिरीक्षकांच्या घरातून पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही आणि काहीही संशयास्पद सापडले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती झोन ६ चे डीसीपी हेमराज राजपूत यांनी दिली आहे.


राजनाथ सिंह आणि चीनच्या संरक्षण मंत्र्यासोबत होणार बैठक

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे चीन आणि रशियन यांच्या संरक्षण मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. या दौऱ्यात चीनचे संरक्षण मंत्र्यांचा दौरा हा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीच्या संदर्भात होत आहे.

 

First Published on: April 27, 2023 8:25 PM
Exit mobile version