अखेर तो गावगुंड मोदी सापडला, भंडारा पोलिसांकडून चौकशी

अखेर तो गावगुंड मोदी सापडला, भंडारा पोलिसांकडून चौकशी

अखेर तो गावगुंड मोदी सापडला, भंडारा पोलिसांकडून चौकशी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्या गावगुंड मोदीबाबत वक्तव्य केलं होते. तो गावगुंड मोदी अखेर सापडला आहे. मोदीला मी मारु शकतो आणि त्याला शिव्या देऊ शकतो असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नाना पटोलेंनी वक्तव्य केले असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. यावरुन भाजपच्या नेत्यांनी नाना पटोलेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्याविरोधात अनेक पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. भंडारा पोलिसांना गावगुंड मोदी सापडला आहे. त्याचे नाव उमेश घरडे असे असून घाबरल्यामुळे गायब होतो असे त्याने म्हटलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्या गावगुंड मोदीला मी मारु शकतो असे म्हटलं होते. तो गावगुंड मोदी आता समोर आला आहे. या मोदीची भंडारा पोलिसांनी चौकशी केली आहे. घाबरल्यामुळे गायब होतो अशी प्रतिक्रिया या गावगुंड मोदीने दिली आहे. त्याचे नाव उमेश घरडे असे असून तो लाखनी तालुक्यातील गोंदी गावचा रहिवासी आहे. घरडे आपल्या पत्नी आणि मुलासह न राहता एकटा राहतो. परंतु त्याच्यावर कोणत्याही तक्रारी आणि तो गावगुंड नाही असे गावकाऱ्यांचे मत आहे. पोलिसांनी आपला अहवाल तयार करुन वरिष्ठांना पाठवला आहे.

काही दिवसांपुर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपण मोदीला मारु शकतो आणि त्याला शिव्या देऊ शकतो असे वक्तव्य केले होते. यावरुन नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वक्तव्य केले असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत नाही तर गावगुंड मोदीबाबत बोललो होतो असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले होते.

गावगुंड मोदीने काय दावा केला?

गावगुंड मोदी म्हणजेच उमेश घरडे याने असा दावा केला आहे की, दारु पिल्यावर माझा मित्र मला भेटला त्याने मला धमकी दिली होती. शिवीगाळ केल्यानंतर मित्राने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे माझ्याबाबत तक्रार केली. तक्रार केल्यानंतर मला माहिती पडले. मग पोलिसांसमोर हजर झालो. यानंतर लोकांचे येण जाण वाढले होते. घाबरल्यामुळे नागपूरला आलो असल्याचे उमेश घरडेने सांगितले आहे.


हेही वाचा : Anil Deshmukh : चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझे अनिल देशमुखांना विचारणार प्रश्न

First Published on: January 21, 2022 5:47 PM
Exit mobile version