घरताज्या घडामोडीAnil Deshmukh : चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझे अनिल देशमुखांना विचारणार प्रश्न

Anil Deshmukh : चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझे अनिल देशमुखांना विचारणार प्रश्न

Subscribe

मनसुख हत्या आणि अँटिलिया प्रकरणाबाबत एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित खंडणीबाबत केलेल्या आरोपींची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून चांदीवाल समिती नेमण्यात आली आहे. या समितीसमोर अनिल देशमुखांना आज हजर करण्यात आले आहेत. चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांना प्रश्न विचारण्यासाठी विनंती केली होती. त्यानंतर चांदीवाल आयोगाने सचिन वाझेंना परवानगी दिली.

चांदीवाल आयागोसमोर ज्याप्रकारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केले होते. त्या आरोपांची चौकशी केली जात आहे. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस चांदीवाल आयोग शासनाकडे आपला अहवाल सादर करणार आहे.

- Advertisement -

मनसुख हत्या प्रकरणी आणि अँटिलिया प्रकरणाबाबत सचिन वाझे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. परंतु सचिन वाझे यांनी चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुखांना काही प्रश्न विचारण्यासाठी विनंती केली होती. त्यानंतर आयोगाने त्यांना परवानगी दिली. सचिन वाझे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काही प्रश्न विचारले आहेत.

जीआरमध्ये तुमचा सहभाग होता का?

मिळालेल्या माहितीनुसार, परमबीर सिंह यांच्याविरोधात ३० मार्च रोजी एक जीआर काढण्यात आला होता. त्या जीआरमध्ये तुमचा सहभाग होता का?, असा प्रश्न वाझेंनी देशमुखांना विचारला. यावेळी देशमुख म्हणाले की, त्यामध्ये माझा कोणताही सहभाग नव्हता. तसेच जे काही आरोप करण्यात आले होते. त्यामध्येही कोणत्याही प्रकारचा आधार नव्हता, असं देशमुख म्हणाले.

- Advertisement -

या प्रश्न उत्तराचा कालावधी किती महत्त्वाचा?

या प्रकरणामध्ये सचिन वाझे हे महत्त्वाचे साक्षीदार आहेत. कारण ज्यापद्धतीने आरोप करण्यात आले होते. त्यामध्ये परमबीर सिंह यांनी बऱ्याच वेळा सचिन वाझे यांचं नाव घेतलं य. तसेच वाझे गँगचं कनेक्शन अनिल देशमुख यांच्यासोबत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्न उत्तराचा कालावधी खूप महत्त्वाचा आहे.


हेही वाचा : Goa Assembly Election 2022 : गोव्यातून शिवसेना दहा ते बारा जागा लढणार, संजय राऊतांची घोषणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -